Khandoba Navratra 2025: आजपासून ६ दिवस न चुकता म्हणा हे खंडोबाचे प्रासादिक स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 07:00 IST2025-11-21T07:00:01+5:302025-11-21T07:00:02+5:30

Khandoba Navratra 2025: यंदा २१ ते २६ नोव्हेंबर दरम्यान खंडोबाचे षड्रात्र असणार आहे, त्यानिमित्त दिलेली उपासना चुकवू नका.

Khandoba Navratra 2025: Chant this royal hymn of Khandoba for 6 days without fail from today! | Khandoba Navratra 2025: आजपासून ६ दिवस न चुकता म्हणा हे खंडोबाचे प्रासादिक स्तोत्र!

Khandoba Navratra 2025: आजपासून ६ दिवस न चुकता म्हणा हे खंडोबाचे प्रासादिक स्तोत्र!

>> सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी खंडोबाचे षड्रात्र(Khandoba Navratra 2025) सुरु होत आहे. कुलदेवतेची कृपा आपल्या घराण्यावर सतत रहावी यासाठी नवरात्र इत्यादी काळामधे तिची विशेष उपासना करतात. आजपासून खंडोबाचे षड्रात्र घरोघरी बसत आहे. ज्यांचे कुलदैवत श्री खंडोबा आहे त्यांनी आजपासून चंपाषष्ठी पर्यंतच्या ६ दिवसात आपापल्या कुळाचाराप्रमाणे खंडोबाचे पूजन, नामस्मरण करावे. देवता या स्मरणमात्र व स्तुतीने संतुष्ट होत असतात. यासाठीच अनेक सत्पुरुषांनी विविध देवतांची स्तुती व स्तोत्रे रचलेली आहेत. 

खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी

श्री खंडोबाचे असेच एक दिव्य व प्रासादिक स्तोत्र परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी रचलेले आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीत आम्ही मुद्दाम छापलेले आहे, ते सोबत देत आहोत. देव हा अनन्यभावे भक्तीचा भुकेला असून अंत:करणापासून स्तुति केल्यास त्याची कृपा निश्चित संपादन होते. या खंडोबाच्या षड्रात्रोत्सवकाळात या स्तोत्राचे किमान एकवेळा तरी भक्तीभावाने पठण करून श्री खंडोबास भंडारा अर्पण करावा व मल्हारीमार्तंडाची कृपा संपादन करावी.

देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 

श्रीमत्खण्डराजस्तोत्रम्| श्रीशंकरावतारोsयं खण्डराजो महामतिः। 
तस्मै महालसेशाय मणिमल्लारये नमः।।१।। 
ऋषीणां यस्तपःसिद्ध्या अवतीर्य महीतले। 
दैत्याननाशयत्तस्मै मणिमल्लारये नमः।।२।। 
यो वेदमयमास्थाय महाश्वमपराजितम्। 
जघ्ने दैत्यरिपून्तस्मै मणिमल्लारये नमः।।३।। 
पीतवस्त्रपरीधानः पीताभरणभूषितः। 
त्रैलोक्यवंदितस्तस्मै मणिमल्लारये नमः।।४।। 
मार्गशीर्षे महामासे प्रत्यब्दं यन्महोत्सवः।
योsभीष्टदो विभुस्तस्मै मणिमल्लारये नमः।।५।। 
देवः प्रतापमार्तण्डभैरवः शत्रुकृन्तनः। 
सर्वापत्तिहरस्तस्मै मणिमल्लारये नमः।।६।। 
खण्डराज प्रसीद त्वं सर्वापत्तिमपाकुरु। 
पाहि मां त्वं प्रभो तुभ्यं मणिमल्लारये नमः।।७।। 
कायेन मनसा वाचा येsपराधा मया कृताः। 
तां क्षमस्व प्रभो तुभ्यं मणिमल्लारये नमः।।८।। 
खण्डराजस्तुतिमिमां त्रिसंध्यं यः पठेद्द्विजः। 
सर्वान्कामान्स आप्त्वेह शिवलोके महीयते।।९।। 
इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीखण्डराजस्तोत्रं संपूर्णम्।। 

Web Title : खंडोबा नवरात्र 2025: ये स्तोत्र छह दिन तक अवश्य गाएं!

Web Summary : खंडोबा षडरत्र 21 नवंबर से शुरू। आशीर्वाद के लिए टेंबे स्वामी द्वारा खंडोबा स्तोत्र का पाठ करें। इन छह दिनों में श्री खंडोबा को भंडारा अर्पित करें।

Web Title : Khandoba Navratra 2025: Recite this Stotra for six days!

Web Summary : Khandoba Shadrara starts November 21st. Recite Khandoba's stotra by Tembe Swami for blessings. Offer Bhandara to Shri Khandoba during these six days.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.