Kalashtami: घराबाहेर जाईल इडा-पिडा; आज कालाष्टमीच्या सायंकाळी उंबरठ्यावर ठेवा तिळाचा दिवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:12 IST2026-02-09T11:11:04+5:302026-02-09T11:12:06+5:30
Kalashtami Astro Tips, Vrat Importance: आज सोमवार आणि मासिक कालाष्टमी; ज्योतिष शास्त्रात दिलेल्या 'या' उपायाने घरात येईल सकारात्मक शक्ती.

Kalashtami: घराबाहेर जाईल इडा-पिडा; आज कालाष्टमीच्या सायंकाळी उंबरठ्यावर ठेवा तिळाचा दिवा!
आज सोमवार आणि मासिक कालाष्टमी(Kalashtami) ही तिथी भगवान शिव यांचे रौद्र रूप असलेल्या भगवान कालभैरवांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आजच्या विशेष तिथीचे महत्त्व आणि तुमच्या घराचे रक्षण करण्यासाठी करायचा प्रभावी उपाय याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
महाशिवरात्री २०२६: महाशिवरात्रीपूर्वी ७ दिवस करा 'हा' उपाय; अनुभवा महादेवाच्या शक्तीचा चमत्कार!
आज मासिक कालाष्टमी आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला 'कालाष्टमी' साजरी केली जाते. हा दिवस भगवान कालभैरवांना समर्पित आहे, ज्यांना 'काळाचे अधिपती' मानले जाते. कालभैरवांची उपासना केल्याने भीती, शत्रूबाधा आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
आजच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या घराला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितला आहे.
अचूक वेळ:
हा उपाय ९ फेब्रुवारी रोजी सोमवारी सायंकाळी ८.०० ते ८.१८ या कालावधीत करणे विशेष लाभदायी ठरेल.
घराच्या रक्षणासाठी 'तिळाच्या तेलाचा' दिवा
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा घरात सतत कटकटी आणि नकारात्मकता जाणवते, तर आज सायंकाळी खालील विधी नक्की करा:
Valentine Week 2026: 'या' जन्मतारखांचे लोक असतात 'मेड फॉर इच अदर'; व्हॅलेंटाईन वीक निमित्त खास उलगडा
उपाय करण्याची पद्धत:
१. दिवा निवडणे: सायंकाळी एक मातीचा दिवा घ्या.
२. टिळा लावणे: त्या दिव्यास श्रद्धेने कुंकवाचा टिळा लावा.
३. तेल आणि वात: दिव्यात तिळाचे तेल टाका आणि कापसाची वात लावून तो प्रज्वलित करा.
४. काळे तीळ: प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या तेलात थोडे काळे तीळ टाका.
५. उंबरठ्यावर स्थापना: हा दिवा आज सायंकाळी तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर (बाहेरच्या बाजूला तोंड करून) ठेवा.
कालभैरव मंत्राचा जप
दिवा लावल्यानंतर उंबरठ्यावर हात जोडून 'ओम कालभैरवाय नमः' या मंत्राचा ११ वेळा स्पष्ट उच्चारात जप करा. भगवान कालभैरवनाथांना प्रार्थना करा की, तुमच्या घराचे सर्व संकटांपासून रक्षण व्हावे.
या उपायाचे फायदे
नकारात्मक ऊर्जा: घरातील नकारात्मक शक्ती घराबाहेर जातात.
दृष्ट बाधा: घराला किंवा घरातील सदस्यांना लागलेली वाईट नजर उतरते.
सुरक्षा कवच: कालभैरवनाथांच्या कृपेने तुमच्या घराभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होते, ज्यामुळे घराची भरभराट होते.
मासिक कालाष्टमी म्हणजे काय?
कालाष्टमी ही तिथी भगवान शिवाच्या कालभैरव अवताराच्या प्रकट दिनाचे स्मरण करून देते. कालभैरव हे न्यायदेवता असून ते शिस्तीचे प्रतीक आहेत. जे भक्त या दिवशी त्यांची मनोभावे पूजा करतात, त्यांच्या आयुष्यातील अडथळे आणि 'काळ' (मृत्यूचे भय) दूर होतो. त्यामुळे आजच्या तिथीला केलेला हा उपाय तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.