शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

आनंद मिळवण्यासाठी स्वतःमध्ये डोकावून पहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 8:53 AM

सुखोपभोग तुम्ही फार काळ टिकवून ठेवू शकणार नाही. पण आनंद ही अशी अवस्था आहे जी कशावरही अवलंबून नाही.

प्रश्न: आपण असे म्हणता की जेंव्हा मनुष्य आनंदी असतो, तेंव्हा तो अधिक जुळवून घेणारा, अधिक मुक्त, “मी”पणाच्या ओझ्याखाली कमी दबलेला असतो. हा आनंद नक्की काय आहे? सद्गुरु, आपण या आनंदाचे वर्णन करू शकता का?सद्गुरु: मी तुम्हाला कसे सांगू? हा प्रश्न खरं म्हणजे आनंदाच्या स्वरुपाच्या विशिष्ट गैरसमजुतीतून उदभवू शकतो. आज अगदी मनाला उत्तेजित करणार्‍या औषधं, मादकपदार्थांनासुद्धा “आनंद” असे नाव देण्यात येते. तुम्ही जेंव्हा “आनंद” असे म्हणता, तेंव्हा पाश्चात्य देशातील लोकांना त्यांना असे वाटते की तुम्ही एखाद्या विशिष्ट औषधी गोळी किंवा औषधाबद्दल बोलता आहात.

“खरा आनंद” आणि “खोटा आनंद” अशी कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही जेंव्हा सत्यात असता, तेंव्हा तुम्ही आनंदात असता. जेंव्हा तुम्ही खरोखरच सत्याच्या सान्निध्यात असता, तेंव्हा साहजिकच तुम्ही आनंदात असाल. आनंदी असणे आणि आनंदी नसणे ही तुमच्यासाठी तुम्ही सत्यात आहात की नाही याची लिटमस टेस्ट करण्यासारखे आहे. हा प्रश्न कदाचित एका विशिष्ट मानसिकतेतून येतो: “मी जर सूर्यास्त पहात असेन, मी आनंदी झालो, तर तो खरा आनंद आहे का? किंवा मी जेव्हा प्रार्थना करतो, मी जर आनंदी झालो, तर तो खरा आनंद आहे का? किंवा मी जेंव्हा ध्यान करत असतो आणि आनंदी होतो, तेव्हा तो खरा आनंद असतो का?बहुतेक लोकांमध्ये सुखोपभोग म्हणजेच आनंद अशी गैरसमजूत आहे. सुखोपभोग तुम्ही फार काळ टिकवून ठेवू शकणार नाही. पण आनंद ही अशी अवस्था आहे जी कशावरही अवलंबून नाही. सुखोपभोग हा नेहमी कशावर किंवा कोणावर तरी अवलंबून असतो. पण आनंद हा कशावर किंवा कोणा व्यक्तीवर अवलंबून नाही. तो तुमचा प्राकृतिक स्वभावच आहे. एकदा तुम्ही त्याच्या सान्निध्यात आलात की तुम्ही त्यात स्थित होता, एवढंच.आनंद हा काही तुम्ही बाहेरून मिळवण्याजोगा नाहीये, तो तुम्ही तुमच्या आतच, खोलवर शोधून काढता. ती अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आत खोलवर खणून शोधून काढता. हे जणू एक विहीर खोदण्यासारखे आहे. जर तुम्ही तुमचं तोंड उघडून पावसाचे थेंब तोंडात पडण्याची वाट बघत बसलात, तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काही थेंब तोंडात पडू शकतात. पण तोंड उघडून पावसाची वाट बघत तहान भागवण्याची ही एक अगदी दयनीय आणि निराशजनक स्थिती आहे. त्याशिवाय पाऊस हा काही शाश्वतपणे पडणारा नाही. एखाद, दोन तास पडेल आणि थांबणार.

यासाठीच तुम्ही आपली स्वतःची अशी एक विहीर खणता – जेणेकरून वर्षभर पाणी उपलब्ध असेल. जे काही तुम्ही खरा परमानंद म्हणता ते एवढंच आहे, तुम्ही आपली स्वतःची अशी एक विहीर खणली आहे आणि तुम्हाला पाण्याचा सापडलं आहे जे तुम्हाला सदासर्वदा तृप ठेवेल. आता तुम्ही पाऊस पडत असताना तोंड उघडून बसत नाही. नाही. आता तुमच्याजवळ निरंतर पाण्याचा साठा आहे. हाच आहे परमानंद.