शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
2
Smriti Mandhana : "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
3
EMI चा भार हलका होणार! RBI च्या निर्णयापाठोपाठ 'या' ४ बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
4
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
5
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
6
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
7
Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...
8
कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन...
9
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
10
फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड
11
गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
12
बनावट कागदपत्रं दाखवून लाटली सरकारी नोकरी, १० वर्षांनंतर फुटलं बिंग, स्टाफ नर्सवर कारवाई
13
गोव्यातील क्लब दुर्घटनेनंतर मोठा प्रश्न! गॅस स्फोटात विम्याचे नियम काय? 'या' चुकीमुळे ५० लाखांचे कवच गमावले!
14
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
15
Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'
16
इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
17
IND vs SA : टॉस जिंकला नसता तर... विराट-अर्शदीपचा 'सेंच्युरी पे सेंच्युरी' व्हिडिओ व्हायरल
18
अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला
19
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
20
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
Daily Top 2Weekly Top 5

July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:20 IST

July Born Astrology: गूढ व्यक्तिमत्त्व आणि चंचल स्वभाव तरी प्रभावी निर्णयक्षमता; जाणून घ्या जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!

जुलै महिन्यात जन्मलेल्या(July Born Astrology) लोकांना समजून घेणे, हे अवघड काम आहे. हे लोक अत्यंत गूढ विचारांचे आणि स्वभावाने मनस्वी असतात. त्यांच्या वागण्याबोलण्याचा थांगपत्ता लागू देत नाहीत. घटकेत आनंदी घटकेत दु:खी होत भावभावनांच्या लाटांवर स्वार होत राहतात. याच भावनिक आवेगामुळे आणि संवेदनशील स्वभावामुळे हृदयाने कोमल असतात. प्रसंगी हळवे होतात.

Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन स्पष्ट असल्याने करिअर बाबतील ध्येय निश्चित असत़े  निर्णयप्रक्रियेत फार काळ न घालवता, त्वरित निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामुळे कोणासाठी, कोणामुळे झुरत बसणे हे तुमच्या स्वभावातच नसते. अशा प्रकारच्या मोठ्या मानसिक ताणातून तुम्ही मुक्त असता. कुठे काय, किती आणि कसे बोलावे, हे तुमच्याकडून शिकावे. स्वभाव चंचल आणि रागाच्या बाबतीत जमदग्नीचा अवतार असलात, तरीदेखील तुमचा राग फार तर अर्ध्या तासात शांत होतो. काही काळात राग विसरून तुम्ही इतके सरळ वागता, की जसे काही घडलेच नाही.

हे लोक घरच्यांचे प्रिय असतात. त्यांच्या ठायी असलेल्या प्रतिभेमुळे मित्रपरिवारातही ते हवेहवेसे वाटतात. तसे असले, तरी तुमचा स्वभाव थोडा मुत्सद्दीपणा, स्वार्थीपणा याकडे झुकतो. तुम्ही स्वार्थापुरते दुसर्यांना वापरून घेता. जे कामाचे नाहीत, त्यांच्याशी तुम्ही मैत्रीच काय, ओळखही ठेवत नाहीत. 

कामात तरबेज असूनही तुमचा आळस तुम्हाला नडतो. मनात आणले, तर तुम्ही तुम्हाला हवे ते सहज मिळवू शकता. या महिन्यात जन्मलेले लोक साधारणपणे खेळाडू किंवा व्यावसायिक म्हणून ओळख बनवतात. शेअर मार्केट मध्ये त्यांना रस असतो आणि लाभही मिळवतात. व्यावहारिक गणितात कच्चे असले, तरीही नातेसंबंधांचे गणित अतिशय उत्कृष्टपणे सांभाळतात. पैशांची कमतरता कधी जाणवत नाही आणि पैसे खर्च करताना ते फार विचारही करत नाहीत. त्यांना उच्च राहणीमान आवडते.

Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!

व्यक्तीपारख करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत त्यांची सहसा फसवणूक होत नाही. ते क्वचितच कोणाच्या प्रेमात पडतात आणि ज्याच्याशी नाते जोडतात, त्याच्याशी नाते निभावतात. जोडीदार फसवणूक करत असेल, तर ते लगेच सावध होतात. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना दुसऱ्याला आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. प्रेम मिळवण्याच्या बाबतीत ते भाग्यवान ठरतात.

या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना समाजसेवेची आवडही दिसून येते. त्यात यश आणि लौकिकदेखील प्राप्त होता़े लोकसंग्रह होतो. हे लोक अपयशाने खचून जात नाहीत. कितीही कठीण प्रसंग असो, धैर्याने तोंड देतात. त्यांच्या ओठावरचे हसू तसूभरही कमी होऊ देत नाहीत. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे त्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा समोरच्याला अदमास लागू देत नाहीत. यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगतात. 

या महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार,  प्रियंका चोप्रा, महेंद्रसिंग धोनी, दलाई लामा, अझिम प्रेमजी, पी.व्ही.सिंधू, जे.आर.डी टाटा, सोनू निगम, इ

टॅग्स :Astrologyफलज्योतिषDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारPriyanka Chopraप्रियंका चोप्राDalai Lamaदलाई लामाSonu nigamसोनू निगम