शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
4
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
5
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
6
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
7
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
8
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
9
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
10
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
11
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
12
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
13
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
14
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
15
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
16
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
17
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
18
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
19
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
20
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती

Jivati Vrat 2023: यंदाच्या श्रावणात जिवतीची पूजा आधी, मग श्रावणी सोमवार व्रताचा होणार प्रारंभ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 07:00 IST

Jivati Vrat 2023: १७ ऑगस्ट रोजी निज श्रावण मास सुरू होत आहे आणि पाठोपाठ जिवती पूजन; ते कसे करायचे, त्याचे महत्त्व काय त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

यंदा १८ ऑगस्ट रोजी शुक्रवारी जिवतीच्या व्रताने श्रावण मासातले पहिले व्रत सुरू होत आहे. श्रावणातल्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि त्यानुसार व्रताचरण धर्मशास्त्राने आखून दिले आहे. त्यात खूप काही तयारीची गरज नसते. रोजचेच घरातले जिन्नस, भोळा भाव आणि देवपूजा यापलीकडे विशेष काहीही तयारी अभिप्रेत नसते. परंतु या व्रतांमुळे केलेले धर्माचरण मनाला दीर्घकाळ प्रसन्नता देणारे ठरते. हे आपण आपल्या आई आजींकडून अनुभवले आहे. फार ओढाताण न करता आपणही शक्य तेवढा हा संस्कृतीचा वसा जपण्याचा आणि पुढे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करू जिवतीच्या व्रताने!

जिवतीचे पूजन का केले जाते, तिच्या कागदावरील चित्राचा अर्थ काय हे सांगणारा लेख आपण या आधी दिला आहे. सोबत त्या लेखाची लिंक जोडत आहोत. ती माहिती वाचली असता, पूजेचा उद्देश स्पष्ट होईल आणि जिवती मातेची श्रावणातील चारही शुक्रवारी मनोभावे पूजा करता येईल. 

Adhik Shravan Amavsya 2023: सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी अधिक श्रावण अमावस्येला करा जिवतीचे पूजन; वाचा शास्त्रोक्त माहिती!

या व्रताचा विधी साधारण पुढीप्रमाणे आहे -

श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी बायकांनी हळद कुंकू देऊन दूध, साखर व फुटाणे प्रसाद म्हणून देतात. प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालतात. एका शुक्रवारी सवाष्ण जेवायला घालतात व तिला पुरणपोळीचे भोजन वाढून दक्षिणा देतात. जिवतीचे (Jivati Puja 2023) चित्र लावून गंध, हळदकुंकू, फुले, आघाडा व दुर्वा यांनी पूजा करतात आणि ज्यायोगे देहधारणा होते त्या प्राण, अपान, व्यान, उदान व समान या पंचप्राणांची प्रतीके म्हणून पुरणाच्या पाच दिव्यांची तिची आरती करतात.

मानवी देहाला अन्नमय, मनोमय, प्राणमय, ज्ञानमय, विज्ञानमय, कारणमय आणि आनंदमय हे सात कोश आणि स्थूल देहाचे अर्भक, शिशू, बाल, पौगंड, तरुण, प्रौढ आणि वृद्ध या सात अवस्था आहेत. जीवंतिका या देवता त्या सप्तकोशांचे प्रतीक असून सात बाळे ही त्या अवस्थांची प्रतीके आहेत.

जिवतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करतात. त्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांनाही औक्षण करावे. मुले परगावी असतील तर चारी दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या आणि `हे जिवंतिके, माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर' अशी प्रार्थना केली जाते. जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरण्यात येते. पीतवर्ण या विकारांचे प्रतीक मानण्यात येतो म्हणून जीवंतिका व्रत करणाऱ्या महिलांनी त्या दिवशी पिवळी वस्त्रे परिधान करू नये. 

श्रावणी शुक्रवारी (Shravan Shukravar Vrat 2023) कापसाची वस्त्रे हळद कुंकू लावून जिवंतीकेला अर्पण करावी. देवीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवावा. त्यानिमित्ताने देवी स्वरूपात सुवासिनीचा पाहुणचार करून तिच्या मुला बाळांना भेटवस्तू देऊन जिवतीचा सन्मान करावा. अशा रितीने जिवंतिकेची मनोभावे ही पूजा करून देवीची कृपा प्राप्त करावी.

हे व्रत स्त्रीत्त्वाचे, मातृत्त्वाचे, वात्सल्याचे गौरव करणारे व्रत आहे. आपणही त्याचा एक भाग होऊया. 

Shravan Somwar vrat 2023:महाफलदायी सोळा सोमवारचे व्रत अधिक श्रावणापासून सुरू करायचे की निज श्रावणात ते जाणून घ्या!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल