बाळाचे बारसे करत असाल, तत्पूर्वी ज्योतिषशास्त्राने केलेल्या सूचना वाचा. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 12:20 PM2021-04-03T12:20:44+5:302021-04-03T12:21:13+5:30

हा सोहळा केवळ नामकरण विधी नाही, तर आयुष्यभराची ओळख देणारा उत्सव आहे. 

If you are doing name ceremony, read the instructions given by astrologers before that. | बाळाचे बारसे करत असाल, तत्पूर्वी ज्योतिषशास्त्राने केलेल्या सूचना वाचा. 

बाळाचे बारसे करत असाल, तत्पूर्वी ज्योतिषशास्त्राने केलेल्या सूचना वाचा. 

googlenewsNext

बाळ जन्माला आले की रडत असते, ते 'कोssहम कोssहम' म्हणजे 'मी कोण' असे स्वतःची ओळख विचारत असते. त्याला अनेक लाडिक हाकांनी बोलावले जाते. परंतु बाराव्या दिवशी किंवा दीड-दोन महिन्यांनी पाळण्यात घालून बारसे केले जाते. त्यावेळेस त्याला सुयोग्य नाव देऊन 'सोहम' म्हणजे तू कोण आहेस, कुठल्या कुळात जन्माला आला आहेस ही ओळख दिली जाते. त्यामुळे हा सोहळा केवळ नामकरण विधी नाही, तर आयुष्यभराची ओळख देणारा उत्सव आहे. 

>> बाळाचे नाव काय हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. ते राशीवरूनच ठेवावे, असा ज्योतिषशास्त्राचा आग्रह असतो. कारण त्यावरून बाळाचे सौभाग्य, आरोग्य, पैसा, भविष्य या गोष्टींचा उलगडा होतो. नावाचा अक्षरावरून जन्म वेळी चन्द्रस्थिती कशी होती हे कळते आणि त्यावरून उर्वरित अनुमान काढता येते. 

>> ज्योतिष शास्त्राने १२ राशींवर आधारित वेगवेगळे अनुमान काढले आहेत. नावाचे अद्याक्षर आणि बाकीची ग्रहस्थिती यावरून बाळाला नाव ठेवणे उचित ठरते. बाळाचे नाव ठरवताना जन्म नक्षत्रदेखील पाहिले जाते. 

>> बाळाच्या जन्मानंतर दहाव्या, बाराव्या किंवा सोळाव्या दिवशी बारसे केले तर मुहूर्त बघावा लागत नाही. जर तेव्हा शक्य नसेल, तर पंचांग पाहून शुभ मुहूर्तावर नामकरण विधी केला जातो. 

>> नामकरण संस्कारासाठी अनुराधा, पुनर्वसु, माघ, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तरभाद्रपदा, स्वाती, धनिष्ठा, श्रवण, रोहिणी, अश्विनी, मृगशिर, रेवती, हस्त आणि मृगशिर, रेवती, हस्त और पुश्य नक्षत्र उत्तम मानले जातात. 

>> पौर्णिमा आणि अमावस्येला नामकरण विधी करू नये. 

Web Title: If you are doing name ceremony, read the instructions given by astrologers before that.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.