शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

नवस करणे कितपत बरोबर आहे? याबाबतीत धर्मशास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 14:20 IST

देवाविषयी प्रेम असणारा भक्त कधीच नवस करत नाही.

अलीकडच्या काळातील नवस करण्याची प्रथा इतकी घातक आणि विकृत झाली आहे, की त्यातून फक्त श्रद्धानाश हेच फळ मिळू शकेल. अशा वेळी प्रश्न उद्भवतो, की नवस करणे खरोखरच योग्य आहे का? तो फळतो का? यामागे शास्त्रविचार काय आहे, ते 'शास्त्र काय सांगते' या पुस्तकाच्या आधारे समजून घेऊ.

साधना, उपासना व धर्माचरण या दोन गोष्टी शुद्ध भक्तीने व प्रांजळ मनाने केल्यास त्याचे अलौकिक फळ मिळते. पण जेव्हा वास्तव श्रद्धेचा अभाव, धर्मशास्त्राविषयी अज्ञान व अंधपरंपरेचे भूत मानेवर असते तेव्हा त्यातून 'नवसा'सारख्या गोष्टीचा उगम होतो. ज्यावेळी ईश्वराचे मानवीकरण होते तेव्हा त्याच्या नवविधा भक्तीबरोबर अन्यही मानवी विकार दृढ होतात. भक्तासाठी देव मानवाप्रमाणे रूप धारण करून त्याच्याकडून नवविधा भक्ती करून घेतो. पण मानवाला वाटते की, आता देव आनायासे मानवाप्रमाणे वागतोच आहे तेव्हा त्याला थोडेबहुत अमिष देऊन आपले काम करून घेण्यास काय हरकत आहे?

वास्तविक या विश्वात ईश्वराचे साम्राज्य आहे. जेव्हा एखाद्या उद्दिष्टाप्रती चिकाटीने झटणे, त्यासाठी अंगी सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून व अपयश आल्यास त्याची व्यथा सौम्य व्हावी म्हणून ईश्वराची करुणा भाकणे एवढेच मानवाच्या हातात आहे. ते उद्दिष्ट सफल झालेच पाहिजे असा हट्ट मानवाला धरता येणार नाही. कारण त्यासाठी मानवाची कर्मगती कारणीभूत असते. त्यामुळे एखादे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून देवाला नवस बोलणे योग्य नाही.

 

जो त्रिभुवनाचा स्वामी आहे, त्याला मूठभर पेढे, चांदीचा किरीट इ. पदार्थांची आवश्यकता काय? पण भक्ताने प्रेमाने दिलेले शिळे फुलही तो स्वीकारतो. कारण तो प्रेममय असल्याने त्याला प्रेमाची भूक असते. 

नवस करताना बहुतेक वेळा प्रेमाचा अभाव असतो. देवाविषयी प्रेम असणारा भक्त कधीच नवस करत नाही. पण प्रीतीपोटी भक्ती करता भीतीपोटी भक्ती करणारे भक्त एखाद्या उद्दीष्टासाठी एकाच वेळी एकाच नव्हे तर दहा देवांना नवस करतात. चुकून कार्य झालेच तर ते नवस फेडले जातील असेही नाही. कारण काम झाल्यावर नवसाची आठवण राहत नाही. अर्थात आठवण राहिली काय किंवा न राहिली काय, देवाला क्षुद्र वस्तूंची काहीच जरूरी नसते. पण त्याचा भक्तिभाव वाढवण्यासाठी देव झटत असतो.

याचा अर्थ नवसशास्त्र पूर्ण खोटे किंवा निराधार आहे असेही नाही. पण नवस करताना मर्यादांची जाणीव ठेवावी लागते. नवस करताना एकाच दैवताला केला व त्या दैवताविषयी पुरेपूर भक्तिभाव मनात असला तर त्या नवसाला काही अर्थ असतो. 

जी कार्ये सहजगत्या होऊ शकतील, ज्यांच्यासाठी निसर्गाचे नियम बदलावे लागणार नाहीत अशा कार्यासाठी नवस केल्यास व तोही अगदी मनापासून केल्यास ती कामना कळत नकळत अंतर्मनात शिरते व ती वैश्विक मनात प्रविष्ट होते. 

जसे की वर्षारंभी एखाद्या विद्यार्थ्याने विशेष प्राविण्यात उत्तीर्ण होण्याचा नवस केल्यास तो नवस त्याला भरपूर अभ्यासाला प्रवृत्त करेल. मनोबल देईल, उत्साह वाढवेल. त्यामुळे नवस आपोआप पूर्ण होईल. पण उनाड मुलाच्या आईने माझा मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ दे असा नवस केला तर खुद्द ब्रह्मदेवही काही करू शकणार नाही. 

यास्तव मानवी सामर्थ्याच्या मर्यादा, तारतम्य, सभोवतालचे वातावरण लक्षात घेऊन मन:पूर्वक भक्तीने एखादा नवस केल्यास तो सफल होऊ शकेल.