शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

Hanuman Jayanti 2024: कोणत्याही प्रकारच्या संकटमुक्तीसाठी हनुमान जन्मोत्सवाला 'दहा'पैकी 'एक' उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 14:23 IST

Hanuman Jayanti 2024: संकटमोचन अशी ख्याती असलेले हनुमान यांचा २३ एप्रिल रोजी जन्मोत्सव आहे, त्यानिमित्ताने ज्योतिष शास्त्राने दिलेल्या उपायांपैकी एक उपाय जरूर करा!

यंदा २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे आणि योगायोगाने त्यादिवशी हनुमंताचा वार अर्थात शनिवारदेखील आहे. त्यानिमित्ताने हनुमंत उपासनेसाठी पुढील गोष्टी उपयुक्त ठरतील. 

संकट निवारणासाठी कोणी हनुमंताची उपासना करतो, तर कोणी मनोकामना पूर्तीसाठी, कोणी मन:शांतीसाठी, कोणी विशिष्ट हेतू किंवा ईप्सित साध्य करण्यासाठी. अर्थात यासाठी उपासकाचे ठिकाणी चिकाटी, संयम, श्रद्धा आणि निष्ठेची नितांत आवश्यकता असते.

हनुमान भक्त विश्वनाथ लघाटे यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून हनुमान उपासनेचा ध्यास घेतला होता. त्या उपासनेची त्यांना प्रचिती आली होती. ही अनुभूती इतरांनाही घेता यावी, म्हणून त्यांनी उपासनेचे मार्ग सांगितले.

१. सलग ११ दिवस हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे त्याचे दर्शन घेणे.

२. दररोज हनुानाच्या मंदिरात जाऊन ११, २१, ३१, ४५,५१ प्रदक्षिणा घालणे.

३. दररोज `भीमरुपी महारुद्रा' या मारुती स्तोत्राची २१ आवर्तने करणे.

४. ही आवर्तने करताना हनुमानाच्या मूर्तीवर सोवळ्याने अभिषेक करणे. 

५. हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण न करणे.

६. `वानरगीते'चे रोज एक पाठ करणे.

७. २१,४२, १२१ दिवस हनुमानाच्या प्रभावी मंत्राचा जप करणे.

८. एखादे आकस्मिक संकट, गंडांतर किंवा खोटा आळ किंवा आरोप आल्यास समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्राची ७,१४,२१ पाठ करून हनुमानाच्या मूर्तीपुढील उदबत्तीचा अंगारा गोळा करून स्वत:च्या कपाळावर लावावा आणि घरात फुंकावा.

९. हनुमान मंदिरात किंवा ११ मारुतींच्या स्थानांपैकी  एखाद्या स्थानावर बसून स्वहस्ताक्षरात मारुती स्तोत्र लिहून काढावे. त्याच्या ८ प्रती काढून ८ अविवाहित पुरुषांना वाटाव्यात. तसेच त्यांच्याकडून या स्तोत्राचे सामुदायिक पठण करून घ्यावे. नंतर सर्वांना भोजन व दक्षिणा द्यावी.

१०. 'ओम नमो भगवते हनुमंताय नम:' या प्रभावी हनुमान मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास दु:ख, दैन्य, वा दारिद्रय तुमच्या आसपास फिरणार नाही. 

वरील उपासनांपैकी कोणतीही एक उपासना वाचकांनी निष्ठापूर्वक केल्यास त्यांच्यावर हनुमंताची कृपा होईल, यात तिळमात्रही संशय नाही!

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीAstrologyफलज्योतिष