Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:25 IST2025-07-10T15:21:33+5:302025-07-10T15:25:24+5:30

Guru Purnima 2025 Evening Puja: आज गुरुवारी गुरु पौर्णिमा आल्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे, त्या मुहूर्तावर ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय करा, यशस्वी व्हाल!

Guru Purnima 2025: Do this remedy in the evening on Guru Purnima; stalled tasks will be cleared! | Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!

Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!

यंदा गुरुवारी गुरुपौर्णिमा(Guru Purnima 2025) आल्यामुळे या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या सायंकाळी दत्तगुरूंना, स्वामी समर्थांना किंवा तुमच्या उपास्य गुरूंना पिवळ्या रंगाच्या प्रसादाचा नैवेद्य दाखवला आणि एखाद्या गरजू व्यक्तिला पिवळ्या वस्त्राचे दान दिले तर त्याचे सकारात्मक फायदे होऊ लागतात. उपाय सोपे आहेत पण ते गुरुवारी पिवळ्या रंगानेच करणे अपेक्षित आहे. 

हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. मग ती लग्नाची हळद असो, नवऱ्या मुलीची पिवळी साडी असो, नाहीतर सौभाग्याचे प्रतीक असणाऱ्या कुंकवाला हळदीची जोड असो, या रंगाशिवाय त्या संकल्पनांना पूर्णत्त्व नाही. जाणून घेऊया या रंगाची महती!

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेला दिवसभरात 'या' पाच पैकी एक मंत्र १०८ वेळा म्हणा आणि गुरुसेवेचे पुण्य मिळवा!

सूर्यकिरणांसारखा स्वच्छ आणि प्रभावी रंग असतो पिवळा! या रंगाच्या कोणत्याही छटा बघा, त्या आल्हाददायकच वाटतात. म्हणून आपल्या संस्कृतीत, अध्यात्मात, आयुर्वेदात, विज्ञानात सर्वत्र या रंगाचा वापर दिसून येतो. ज्योतिष शास्त्राने देखील हा रंग शुभ रंग ठरवला आहे. हा रंग बृहस्पती अर्थात गुरु या ग्रहाचे प्रतीक मानला जातो. म्हणून ज्यांची ग्रहदशा ठीक नसते त्यांना पिवळ्या कपड्यांचा वापर करून गुरुबळ वाढवण्याचा सल्ला दिला जातो. 

पिवळा रंग अतिशय शुभ आहे आणि गुणकारीसुद्धा! म्हणून दिवसाची सुरुवात सूर्यदर्शनाने करा असे सांगतात. कारण त्या स्वच्छ पिवळ्या रंगाने व्यक्तीच्या पचनसंस्थेवर, रक्ताभिसरणावर आणि डोळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो.

Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरु उदय; 'या' राशींवर पडणार जबरदस्त प्रभाव, होणार भाग्योदय!

असेही म्हटले जाते की पिवळ्या रंगात नैराश्यावर मात करण्याची क्षमता असते. ज्योतिष शास्त्रानुसार हा रंग नकारात्मक विचार दूर ठेवतो. मन शांत करतो. म्हणून वास्तु शास्त्रानेदेखील आपल्या शयन कक्षात अर्थात बेडरूममध्ये भिंतींना पिवळा रंग किंवा पिवळे पडदे, चादर किंवा पिवळ्या रंगाचे निसर्गचित्र लावावे असे सांगितले आहे. 

पूजेत पिवळ्या रंगाचा विशेष वापर केला जातो. पितळी उपकरणी घासून लक्ख केली की सोन्यासारखी पिवळी दिसू लागतात. घराच्या मुख्य द्वारावर हळद कुंकवाने गृहलक्ष्मीच्या हाताचे ठसे उमटवले जातात. त्यामुळे नकारात्मक उर्जेला प्रतिबंध होतो. हळद गुणकारी आहेच शिवाय भगवान विष्णूंनाही तिचा रंग प्रिय आहे. म्हणून अनेक लोक दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालून देवदर्शनाला जातात. तसेच महत्त्वाच्या कामाला जाताना पिवळ्या रंगाचे कपडे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलवतात आणि काम होण्यास हातभार लावतात. 

Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेपासून चातुर्मासात दर गुरुवारी करा 'हे' उपाय; धनसंपत्ती मिळेल अपार!

त्यामुळे गुरुपौर्णिमेला गुरुवारी तसेच चातुर्मासातल्या प्रत्येक गुरुवारी पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य आणि पिवळ्या वस्तूंचे दान करायला विसरू नका. 

(सदर माहिती ज्योतिष शास्त्रावरील प्राथमिक माहितीच्या आधारे दिली आहे.)

Web Title: Guru Purnima 2025: Do this remedy in the evening on Guru Purnima; stalled tasks will be cleared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.