शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

Ganga Dussehra 2025: आजपासून दहा दिवस गंगा दशहरा उत्सवात 'या' चुका टाळा आणि दिलेले नियम पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:30 IST

Ganga Dussehra 2025: आपल्या प्रत्येकाच्या देवघरात गंगा असते आणि आपण तिचे रोज पूजन करतो, मात्र हा उत्सव आहे खास, या दहा दिवसात सांगितलेली पथ्य पाळा!

गंगा पृथ्वीवर अवतरली तो दिवस गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो. यंदा २७ मे ते ५ जून गंगा दशहरा(Ganga Dussehra 2025) उत्सव साजरा केला जाणार आहे. पापांचा नाश करणाऱ्या गंगा नदीला सनातन धर्मात अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. गंगेत स्नान करणारी व्यक्ती पावन होते अशी आपली श्रद्धा आहे. म्हणून प्रत्येक पूजा आणि शुभ कार्यात गंगाजलाचा वापर केला जातो. तसेच मृत्युमुखी पडलेल्या किंवा मृत व्यक्तीच्या तोंडात पापक्षालन व्हावे म्हणून अखेरचे गंगाजल घातले जाते. त्यामुळे बहुतेक हिंदू घरात गंगाजल ठेवले जाते.

Ganga Dussehra 2025: गंगा दशहरा उत्सवाच्या दहा दिवसात घरच्या घरी मिळवा गंगास्नानाचे पुण्य!

>> गंगेचे पावित्र्य जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी पुढील चुका टाळा-

>> स्नान केल्याशिवाय गंगा जलाला कधीही स्पर्श करू नका. देहाची शुद्धता महत्त्वाची!

>> मांस आणि मद्य सेवन केले असेल तर गंगाजलाला स्पर्श करू नका. अन्यथा पाप लागते.

>> देव्हाऱ्यात गंगाजल ठेवताना तिथे स्वच्छता राखा. 

>> गंगाजल ठेवण्यासाठी घरातील सर्वोत्तम स्थान म्हणजे घराचा ईशान्य कोपरा. ही बाजू देवांची बाजू मानली जाते. 

>> प्लास्टिकच्या बाटलीत गंगाजल कधीही ठेवू नका. प्लॅस्टिक हे अशुद्ध असून त्यामध्ये जास्त काळ गंगाजल ठेवल्याने त्यात विषारी रसायने होतात. गंगाजल नेहमी पितळी, तांबे किंवा चांदीच्या भांड्यात ठेवणे चांगले.

>> गंगाजल कधीही अंधारात ठेवू नका. रात्रीच्या वेळीही येथे मंद प्रकाशाची व्यवस्था ठेवा.

>> घरात सोहेर किंवा सुतक असेल तर गंगाजलाला स्पर्श करू नये. बाहेरील अन्य व्यक्तीला तसेच नातेवाईकांना गंगाजल शिंपडून घरशुद्धी करण्यास सांगावे!

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी