Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:35 IST2025-10-01T17:34:18+5:302025-10-01T17:35:04+5:30
Dussehra 2025: दसर्याच्या सायंकाळी रावण दहन बघून घरी आल्यावर दिलेला ज्योतिष शास्त्रीय उपाय जरूर करून बघा.

Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
दसऱ्याला रावणाचे दहन करून वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय ही शिकवण आपण घेतोच, त्याबरोबर आयुष्यातील अनेक नकारात्मक गोष्टींचे दहन करण्यासाठी ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी सांगितलेला दसरा विशेष उपाय जरूर करा.
नवरात्रीचे नऊ दिवस आपण शक्ती पूजा केली. ज्यामुळे आपला आत्मविश्वास, सकारात्मकता वाढली. ही ऊर्जा टिकून राहावी म्हणून दसऱ्याला रावण दहन विधी करून आपण वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय हा संदेश घेतो. त्याबरोबरच ज्योतिष शास्त्रात असा एक उपाय सांगितला आहे, ज्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊन आयुष्यातील तसेच घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल आणि कुटुंबीयांचा वैयक्तिक विकास होईल. तो उपाय कोणता ते जाणून घेऊ.
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
नवरात्रीच्या नवमीला किंवा दसऱ्याला सायंकाळी करा पुढील उपाय :
- एक धुपाचे भांडं किंवा छोटी वाटी घ्या.
- त्यात ११ लवंग, थोडासा भीमसेनी कापूर आणि गायीचे तूप घ्या.
- तुमच्या घराचा मध्यभाग, ज्याला ब्रह्मस्थान म्हटले जाते तिथे बसा.
- मध्य भाग कोणता हे लक्षात येत नसेल तर देवघरासमोर बसा.
- धुपाच्या भांड्यात भीमसेनी कापूर घाला, त्यावर लवंगा ठेवा, ते जाळा आणि त्यावर दोन-तीन थेंब गायीचे तूप घाला.
- त्यावेळेस कनकधारा स्तोत्र म्हणा.
- हे स्तोत्र पाठ नसेल तर इंटरनेटवर स्तोत्र लावा आणि त्याचे श्रवण करा.
- या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल आणि आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक वृद्धी होईल.
- पहा व्हिडीओ :