Diwali 2025: या दिवाळीत स्वतःला द्या एक छोटासा ब्रेक; तुमचे टॅरो कार्ड काय सांगते पहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:00 IST2025-10-18T12:59:10+5:302025-10-18T13:00:50+5:30
Diwali 2025: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तसेच तुमच्या राशीनुसार दिलेल्या सूचनांचे पालन करून साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Diwali 2025: या दिवाळीत स्वतःला द्या एक छोटासा ब्रेक; तुमचे टॅरो कार्ड काय सांगते पहा!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१९ ते २५ ऑक्टोबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १: (राशी वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या बुध्दीने काम करण्याचे प्रसंग घेऊन येत आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. कामामध्ये संकल्पना आखल्या जातील, नियोजन चांगले होईल. सक्षमतेने पुढे जाल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचे बोलणे स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" हे सिद्ध करुन दाखवा. ही दिवाळी तुम्हाला अधिक सक्षम करेल!
नंबर २: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा आरामाचा असणार आहे. तुम्ही पूर्वी बरेच श्रम केले आहेत, आता दिवाळीत तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. तुम्हाला तुमचा स्वतंत्र वेळ मिळेल, या निवांतपणात तुम्ही आत्मपरीक्षण करू शकाल. ही दिवाळी तुमच्यासाठी निवांतपणा घेऊन येत आहे, त्यामुळे "आनंदी आनंद गडे" असा अनुभव तुम्हाला येईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही स्वार्थ सोडून इतरांचा देखील विचार करण्याची गरज आहे. हा वेळ स्वतः मधे सुधारणा करण्यासाठी वापरा. जरी तुमच्याकडे चांगली संपन्नता असली तरी वस्तूंचा अतिरेक वापर करू नका. गरजेपुरताच वापर करा. आनंद उपभोगताना अत्यंत विनम्र रहा. दिवाळी दिमाखात साजरी करा, पण दिखावेपणा करू नका!
नंबर ३: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी विश्रांती आणि मध्यांतराचा असणार आहे. खूप कष्ट करुन, बरेच अडथळे ओलांडून तुम्ही एका टप्प्यावर येऊन पोचल्याने आता तुम्हाला थोडा वेळ तरी आरामाची गरज वाटणार आहे. त्यामुळे कामे संथपणे होतील. अपेक्षित उत्तरं, अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. एका जागी थांबला आहात असं वाटेल. संयम ठेवा!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला काम थोडं कमी करुन काही प्रमाणात विश्रांती घेण्याचा संदेश दिला जात आहे. आत्ता स्वतःला थोडं मागे ओढा, थोडा काढता पाय घ्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. धावाधाव थांबवा. जमेल तेवढंच काम करा, दडपण घेऊ नका. वादविवाद आणि अतिवीचार पूर्णपणे टाळा. प्रकृतीकडे नीट लक्ष द्या. या दिवाळी तुम्हाला थोड्या विश्रांतीची गरज आहे!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.