Dhanteras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:59 IST2025-10-17T13:59:22+5:302025-10-17T13:59:55+5:30
Dhanteras 2025 Naivaidya: १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे, या दिवशी इतर वेळी न खाल्ले जाणारे धने गूळ प्रसाद म्हणून का खाल्ले जातात? चला जाणून घेऊ.

Dhanteras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
धनत्रयोदशीला (Dhanteras 2025) अनेक जण धनाची पूजा करतात. त्यामागे पौराणिक कथा आहेत, पण या दिवशी मुख्यत्त्वे पूजा केली जाते, ती भगवान धन्वतरी यांची आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो धने आणि गुळाचा; ही प्रथा आपण दरवर्षी पाळतो, पण कधी त्यामागचे कारण जाणून घेतले आहे का? चला जाणून घेऊ.
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
१७ ऑक्टोबर रोजी वसुबारसेने यंदाची दिवाळी(Diwali 2025) सुरु झाली आणि १८ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात धनत्रयोदशीचा(Dhanteras 2025)! हा दिवस भगवान धन्वंतरी यांची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. धन्वंतरी हे देवांचे वैद्य! आपण सगळे जण पैसे कमावण्याच्या नादात आरोग्य गमावून बसतो. म्हणून दिवाळीत लक्ष्मी पूजे आधी धनत्रयोदशीची आखणी केली असावी. कारण 'हेल्थ इज वेल्थ' आपण नुसते म्हणतो, पण तना-मनाची श्रीमंती सोडून धनाची श्रीमति कमावण्यात आयुष्य घालवतो. भगवान धन्वंतरीच्या कृपेने धनाची श्रीमंती उपभोगण्यासाठी तना-मनाचे आरोग्य उत्तम मिळावे, यासाठी लक्ष्मीबरोबरच त्यांचीही पूजा केली जाते.
हा सण केवळ धन पूजेचा नाही तर आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. म्हणून नैवेद्याला आपण फराळाचे पदार्थ ठेवतो त्याबरोबरच धणे गूळ हेही नैवेद्यात (Dhanteras Naivedyam 2024)ठेवतो. हिवाळ्यात (Winter food) तेलकट पदार्थ खाल्ले तरी ते बाधत नाहीत. म्हणून फराळ करताना संकोचू नका, पण त्याला जोड द्या धणे आणि गुळाची! त्याचे फायदे जाणून घेऊ!
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
१. पोषणतज्ज्ञ हिवाळ्यात गुळ खाण्याचे अनेक फायदे सांगतात. हे सुपरफूड केवळ चयापचय आणि प्रजनन क्षमता सुधारत नाही, तर हाडे मजबूत देखील करते. साखरेमुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचते, त्यामुळे गूळ साखरेला उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस यांसारखी अनेक मिनसल्स आढळतात. त्यामुळे गुळ शरीरासाठी हितकारक ठरतो.
२. धण्यासोबत गुळ खाल्ल्याने मासिक पाळीवेळी होणारा रक्तस्त्राव कमी होतो आणि वेदनांमध्ये आराम मिळतो. याशिवाय गुळ आणि धने यांचे मिश्रण मासिक पाळी सुरू करण्यासाठी उपयुक्त आहे. पीसीओडीमध्ये महिलांसाठी देखील हे मिश्रण चांगले मानले जाते.
३. धनत्रयोदशीला धणे आणि खडीसाखरेचाही नैवैद्य अनेक ठिकाणी दाखवला जातो. पत्री खडीसाखर, शरीराला थंडावा देणे, पचनाचे विकार ते मूत्रविकार यासाठी उपयुक्त असते. त्यासोबत उष्णतेचा त्रास होणे, तोंड कोरडे पडणे यासाठी खडीसाखरही महत्त्वाची. धण्याचे औषधी गुण आणि खडीसारखरेचा गोडवा जगण्यात रहावा, आरोग्य लाभावे ही त्यामागची भावना असते.
Diwali 2025: घराच्या मुख्य प्रवेश द्वाराला उंबरठा का हवा? लक्ष्मी पूजेआधी करा 'हे' बदल!
४. अॅसिडीटी, अपचन यांसाठी धणे अतिशय चांगले असतात. पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होण्यासाठी आयुर्वेदात धणे खाण्याचा सल्ला दिला जातो. आमविकार, जुलाब यांसारख्या तक्रारींवरही धणे आणि खडीसाखर अतिशय उपयुक्त ठरते. वयामुळे किंवा सततच्या ताणामुळे, अतिरिक्त कष्ट झाल्याने थकवा आला असेल तर धणे आणि गूळ हा उत्तम उपाय सांगितला आहे.