Datta Jayanti 2025: स्त्रियांनी गुरुचरित्र नाही तर गुरुचरितामृत वाचावे; काय आहे फरक? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 07:15 IST2025-11-28T07:10:01+5:302025-11-28T07:15:01+5:30

Datta Jayanti 2025: गुरुचरित्र पारायणाने पुण्य मिळते, पण ते स्त्रियांनी वाचू नये असे टेंबे स्वामी म्हणाले, मग गुरुचरीतामृताचा पर्याय का? जाणून घेऊ.

Datta Jayanti 2025: Women should read Gurucharitamrut instead of Gurucharitra; What is the difference? Know! | Datta Jayanti 2025: स्त्रियांनी गुरुचरित्र नाही तर गुरुचरितामृत वाचावे; काय आहे फरक? जाणून घ्या!

Datta Jayanti 2025: स्त्रियांनी गुरुचरित्र नाही तर गुरुचरितामृत वाचावे; काय आहे फरक? जाणून घ्या!

यंदा गुरुवार ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती(Datta Jayanti 2025) आहे. या काळात दत्त उपासना म्हणून अनेक जण गुरुचरित्राचे वाचन करतात. मात्र गुरु चरित्राचे पावित्र्य राखण्यासाठी अनेक नियम पाळावे लागतात. तसेच गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे की नाही याही बाबतीत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. त्यावर पर्याय म्हणजे गुरुचारीतमृत! याबद्दल अधिक माहिती देत आहेत नांदेडचे  योगेश नं काटे. 

दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!

संतकवी श्री  दासगणू महाराज आणि श्री  टेमबेस्वामी :  प.पू.दासगणु महाराज  यांनी  गुरुचरित्रसारामृत नावाची १६ अध्यायी  पोथी लिहली. या पोथीत मोठ्या गुरुचरित्रातील सर्व घटनांचा उल्लेख विस्ताराने केलेला आहे व  विशेष म्हणजे हा ग्रंथ जे  भक्त  सोवळे कर्मठपणाने  इच्छा असुन आचारणात आणण्यास असमर्थ आहेत आशांसाठी  व  स्त्रियांसाठी सुद्धा हे गुरुचरित्रसारामृताचे लिखाण प. पु. दासगणु महाराज  यांनी केले आहे. याला परवानगी प पू.स्वामीनींच दिली आहे असे कुठेतरी वाचले आहे. पण  या ग्रंथाचे ज्या भाविकास पारायण करायचे त्याला साधे नियम पाळावचे लागतील ते  नियम काय व कोणतेआहेत त्याचे विवरण प.पू.अप्पांनी ग्रंथाच्या  सुरुवातीस सांगितले आहे. जिज्ञासु भाविकांनी तो ग्रंथ आवश्य घेवुन पारायण करावे. 

प.पू.स्वामी व प.पू.दादांची भेट दोनदा झाली आहे. पहिली भेट दादा जगन्ननाथाचे दर्शन घेवुन वापस येत असताना राजमेहेंद्रीस उभयतांची भेट झाली या भेटीत प.पू.स्वामीजींनी.प पू दादांना एक श्रीफळ दिले व ते शिर्डी निवासी व  दासगणुमहाराज यांचे सद्गगुरू श्रीसाईबाबा यांना देण्यास सांगितले. साईबाबा श्री  टेंबेस्वमीना त्यांचे वडील बंधु मानीत असत.प.पू. स्वामीजीं विषयी अत्यंत.आदरभावा दादांना होता . स्वामीजींचे  ही दासगणुमहाराजांवर तेवढेच प़्रेम होते. स्वामीजींचे कर्मठ आचारण व सोवळे फार कडक होते.कोणीही त्यांच्याजवळ जाण्यास धजत नसत. मात्र दासगणु महाराजांना त्यांनी कधीच आडवले नाही. हे काही त्यांच्या  शिष्यांना पटले नव्हते व त्यांनी दादांसमोरच त्यांची शंका  स्वामीजींना विचारली त्यावर स्वामीजी  गंमतीने व आराध्याबाबत निष्ठेची परीक्षा पाहावी म्हणून स्वामीजी  म्हणाले "अरे हा पंढरपुरच्या भ्रष्टदेवाचा भक्त कोणीही शिवले तर त्या देवाला चालते.मग हा कशाला फारसे सोवळे - ओवळे पाळतो त्यावर दादा हसले व नम्रपणाने उत्तर दिले  व म्हणाले " महाराज आपल्या दत्तापेक्षा माझा देव पुष्कळ बरा हं! सोवळे कमी आहे पण त्याने धर्म कधी सोडला नाही. दत्तप्रभूंनी मुस्लमानांचे रुप कितीदा तरी घेतले".हे एकताच स्वामीजी खुप मनापासुन हसले समोर बसलेल्या आपल्या शिष्यांना उद्देशुन म्हणाले " आपापल्या आराध्य देवतेवर अशी निष्ठा असावी" आपापल्या अराध्य दैवतेबदद्ल.बोलताना दोघांनाही ही या. एका वैदिक सुत्राचे महत्व  जाणले होते ते म्हणजे " एकं सत् विप्राःबहुधा वदन्ति. 

प.पू.दादा व स्वामीजींची नांदेड येथील भेट :   एकदा योगीराज टेम्बेस्वामीची स्वारी दासगणूच्या कीर्तनासाठी नांदेड येथे  पुंडलिकवाडी  येथे आली.  टेम्बेस्वामी हे. एकनिष्ठ  दत्त भक्त होते म्हणून  दासगणू  महाराजांनी त्यांनी म्हणजे (दासगणु महाराज  यांनी ) रचलेले.श्री एकनाथ चरित्र आख्यान लावले होते. टेमबेस्वामींनी पूर्ण  कीर्तन ऐकले. कीर्तन झाल्यानंतर दासगणु महाराज यांनी  टेम्बेस्वामींचे पाद्यपूजन केले या नंतर  दोघात हितगुजाच्या गोष्टी झाल्या व दासगणु महाराज यांनी  स्वामी महाराजांना विनंती केली  'शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमवि आता' हे पद ऐकविण्याची विनंतीपूर्वक इच्छा प्रदर्शित केली. तेंव्हा स्वामींनी ते पद म्हटले. दासगणुं महाराज यांनी सुद्धा स्वामीजींच्या इच्छेनुसार  'दत्ता येई हो अवधूता जगन्नाथाच्या नाथा' हे प्रासादिक रसाळ काव्य गायले. नर्मदेकाठी श्रीगरुडेश्वर येथे श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या समाधीच्या दर्शनासाठी दासगणू महाराज गेले  तेंव्हा त्यांनी स्वामींवर एक पद रचलेले आहे.अस म्हणताता की  संतांचे स्वरुप वेगळे व कार्यभाग वेळा असला तरी त्यांच्यात किती एकरुपता असते  या दोन प्रसंगावरुन माझ्या लक्षात आले व वाचकांच्याही लक्षात येईल. 

Datta Jayanti: दत्त नवरात्र सुरू होत आहे, नित्य उपासनेत समाविष्ट करा 'हे' दत्त स्तोत्र!

।। श्रीकृर्ष्णापणमस्तू  ।। 

संदर्भः
१) संतकवी दासगणु.महाराज यांचे चरित्र : लेखक: .प्रा.अ.दा.आठवले. 
२) सत्ससंगती - सुगंध:  लेखक: छगन महाराज बारटक्के 
३) गोदातिरीचे संत श्रीदासगणू महाराज विशेषांक

Web Title : दत्त जयंती २०२५: महिलाओं के लिए गुरुचरित्रमृत, एक विकल्प, समझाया गया।

Web Summary : दत्त जयंती आ रही है! गुरुचरित्रमृत को समझें, जो गुरुचरित्र का एक सुलभ विकल्प है, खासकर महिलाओं के लिए। नांदेड के योगेश काटे से इसका महत्व और सरल नियम जानें।

Web Title : Datta Jayanti 2025: Gurucharitramrut, an alternative for women, explained.

Web Summary : Datta Jayanti approaches! Understand Gurucharitramrut, an accessible alternative to Gurucharitra, especially for women. Learn its significance and simple rules from Yogesh Kate, Nanded.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.