दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:50 IST2025-11-18T11:48:24+5:302025-11-18T11:50:28+5:30
Datta Jayanti 2025: यंदा २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरु होत आहे आणि ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती, त्यानिमित्त गुरुचरित्र उपासना करणार असाल तर ही माहिती वाचा!

दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रियांनी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे असे प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) ह्यांनी सांगितलं आहे. पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार, शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. त्यांच्या शरीरात असलेल्या अंड कोशाला बीज मंत्रांनी, मंत्राच्या सामर्थ्याने, उच्चारवाने आघात होवू शकतो. स्त्रियांना मंत्राधिकार नसतात, संध्यावन्दनाचा अधिकार नसतो, म्हणून त्यांच्यासाठी गुरुचरित्र वाचन निषिद्ध मानले जाते.
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
गुरुचरित्रामध्ये पस्तिसाव्या अध्यायात सांगितले आहे की,
स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले॥८॥
विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागली चरणासी। करुणावचनेकरोनिया ॥९॥
श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी ॥
याबाबत शुक्राचार्य यांचा मंत्र त्यांचीच मुलगी दमयंती हिच्यामुळे षट्कर्णी होऊन मंत्रहीन कसा झाला याची कथा येते. त्यामुळे वेद, मंत्र उच्चारण्याबाबत, ऐकण्याबाबत स्त्रियांवर बंधन घातले गेले. मात्र पूर्वी तसे नव्हते.
वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवीत संस्कार केले होते, त्या वेद, उपनिषद जाणत होत्या. शास्त्रोक्त संध्या वंदनादी विधी करून त्या त्या देवता प्रसन्न करवून घेतल्या होत्या. जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता देखील क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर असत, एवढा अधिकार त्यांनी मिळवला होता.
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
वेद काळातील अदिती, उषा, इंद्राणी, इला, सिनीवाली, प्रश्नि या सुप्रसिद्ध देवस्त्री, ब्रह्मर्षी, ऋषिका होत्या. यात अदिती या नावाचा उल्लेख सर्वाधिक झालेला आहे. या साऱ्या सर्वशक्तीमती, विश्वहितैषीणी तथा मंगलकारिणी देवी मानल्या गेल्या. यांच्या शिवाय दिति, सीता, सूर्या, वाक, सरस्वती यांचे देखील स्तवन होते.
कलियुगातील स्त्रियांपुढे वेगळी आव्हाने आहेत, ती सांभाळून धार्मिक व्यवधाने पाळणे कदाचित त्यांना जड जाईल हेच लक्षात घेऊन की काय गुरु टेंबे स्वामींनी गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये तर फक्त ऐकावे असे म्हटले असावे.
यावर उपाय म्हणजे, स्त्रिया दत्त उपासना म्हणून गुरुचरित्र सारामृत अर्थात गुरूचरित्रातील कथांचे सार वाचू शकतात. पाहा व्हिडिओ-