चैत्र पौर्णिमा २०२६: १ एप्रिलचा 'हा' १ तास तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सोडवू शकतो; करा दिलेला १ उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:14 IST2026-04-01T10:12:20+5:302026-04-01T10:14:13+5:30
Chaitra Purnima 2026 Puja in Marathi: चैत्र पौर्णिमा २०२६: १ एप्रिलच्या रात्री 'हा' शुभ मुहूर्त ठरेल 'गोल्डन चान्स'; आयुष्यातील सर्व अडचणी दूर करणारा सोपा उपाय!

चैत्र पौर्णिमा २०२६: १ एप्रिलचा 'हा' १ तास तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सोडवू शकतो; करा दिलेला १ उपाय!
आज १ एप्रिल २०२६ रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आला आहे. एका बाजूला 'पिंक मून'चे (Pink Moon) मनमोहक दर्शन आणि दुसरीकडे चैत्र पौर्णिमेचा(Chaitra Purnima 2026) प्रारंभ! ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजची रात्र तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी 'गोल्डन चान्स' ठरू शकते. ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी सांगितलेला हा विशेष उपाय आणि त्यामागचे शास्त्र याबाबतीत सविस्तर जाणून घेऊ.
Astrology: S आणि P अक्षराच्या व्यक्तींसाठी एप्रिल महिना 'वरदान', १४ एप्रिलनंतर पालटणार तुमचं नशीब!
व्यास सांगतात, जर तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येत असतील किंवा कामे पूर्ण होण्यात अडचणी येत असतील, तर आजची रात्र तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आकाशात 'पिंक मून' दिसणार असून, अंकशास्त्राचाही एक अद्भूत संयोग जुळून आला आहे.
आजचा विशेष 'अर्घ्य' विधी
आज रात्री चंद्राला अर्घ्य दिल्याने मनातील नकारात्मकता नष्ट होऊन जीवनात शुभ फळं मिळतात. तसेच आयुष्यातील अडचणी दूर होऊ शकतात. यासाठी पुढील उपाय मनोभावे करावा.
शुभ मुहूर्त: आज रात्री ८:०८ ते ९:०८ या एका तासाच्या काळात हा उपाय करायचा आहे.
साहित्य: एक तांब्याचा किंवा चांदीचा कलश, शुद्ध पाणी, कुंकू आणि थोड्या अक्षता (अखंड तांदूळ).
कृती: कलशात पाणी भरून त्यात कुंकू आणि अक्षता टाका. त्यानंतर चंद्राकडे पाहत मनोभावे प्रार्थना करा आणि ते पाणी चंद्राला अर्घ्य म्हणून अर्पण करा.
Numerology: तुमच्या मुलांकात दडलंय हनुमानासारखं बळ; करिअर आणि आयुष्यात यश मिळवण्याचं 'हे' आहे गुपित!
या उपायामागचे ज्योतिषीय गणित
आजच्या तारखेचा मुलांक ६ आहे (0+1+0+4+2+0+2+6 = 15.....1+5= 6 अंकशास्त्रानुसार ६ हा शुक्राचा (Venus) अंक आहे. शुक्राचा प्रभाव: शुक्र हा सुख, समृद्धी, प्रेम आणि लक्झरीचा कारक आहे.
फायदा: आज चंद्राची पूजा केल्याने शुक्र आणि चंद्राची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे आर्थिक चणचण दूर होते आणि वैयक्तिक आयुष्यात गोडवा येतो.
का करावा हा उपाय?
आज सकाळी ७:०६ वाजल्यापासून चैत्र पौर्णिमा सुरू झाली आहे. पौर्णिमेची रात्र ही चंद्राच्या पूर्ण शक्तीची रात्र असते. त्यातच उद्या आपण हनुमान जयंती(Hanuman Jayanti 2026) साजरी करणार आहोत. अशा वेळी आज रात्री दिलेले अर्घ्य तुमच्या कुंडलीतील चंद्रदोष दूर करते आणि मनाला प्रचंड उभारी देते.
या उपायामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नानाविध अडचणी दूर होण्यास मदत होईल. जसे की करिअरमध्ये प्रगती, संतती प्राप्ती, विवाह योग, धन संपत्तीतील वृद्धी अशा सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा कारक चंद्र असल्यामुळे आजच्या रात्री दिलेला उपाय करावा असे व्यास सुचवतात. पाहा सोबत दिलेला त्यांचा व्हिडीओ!
टीप: आजची रात्र ही केवळ निसर्गाचा चमत्कार नाही, तर आध्यात्मिक ऊर्जेचा खजिना आहे. श्रद्धेने केलेला एक छोटासा उपाय तुमचं नशीब पालटू शकतो.