शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Chaitra Gudi Padwa 2023: वसंताच्या आगमनाची चैत्र चाहूल: नववर्षाची नवलाई; सृष्टीचा सृजनोत्सव, आनंदाचा महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 12:13 IST

Chaitra Gudi Padwa 2023: चैत्र महिना आणि वसंत ऋतुची होणारी सुरुवात सृष्टीचा सृजनोत्सव मानला जातो. महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या...

Chaitra Gudi Padwa 2023: भारतीय परंपरांमध्ये संस्कृती आणि निसर्गाची सर्वोत्तम सांगड घातल्याचे पाहायला मिळते. ऋतुचक्राप्रमाणे बदलत जाणारे जीवनचक्र, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव, आहार मानवी जीवनाला अतिशय पूरक असल्याचे पाहायला मिळते. भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टी कालातीत आहेत. जग कितीही पुढे गेले, जवळ आले किंवा विस्तारले, तरी याची पारंपरिकता अबाधित असल्याचे पाहायला मिळते. होळी, रंगपंचमी झाल्यानंतर आता अवघ्या सृष्टीला वसंत ऋतुची आणि सामान्यांना नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याची चाहूल लागली आहे. यंदाच्या वर्षी २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडवा असून, शोभन संवत्सरारंभ होणार आहे. 

चैत्रारंभाची किंचितशी चाहूल मन मोहरून टाकते. फाल्गुन महिन्यात होळी आणि रंगपंचमी होऊन गेली असल्याने अगोदरच आपली मने उल्हासित झालेली असतात. खरंतर चैत्र म्हणजे टक्क ऊन! होळीपासून आपल्याला तेजस्वी उन्हाची चुणूक दिसू लागलेली असते. तेच ऊन चैत्रापासून आणखीन तेजाळून निघणार असते. उन्हाळा उसळून येण्याचे हेच ते दिवस. चैत्राचे ऊन म्हणजे फक्त झळा असे नाही. तर, त्यात चैत्राची म्हणून एक सृजनशीलता असते. झाडांना पल्लवीत करणारी आणि फळांना गोडवा आणणारी. चैत्राची मायाही प्रथम मोहरून आलेल्या झाडावर अलगद उतरते आणि मग ती आपणाकडे येते. याच दिवसांत खास चैत्राची म्हणून ओळखली जाणारी फुले ओसंडू लागतात.

रसना तृप्त करायला तयार सज्ज फळांचा राजा आंबा

आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. उन्हाच्या झळा जाणवत असताना, गुलमोहराला अपूर्व ‌रक्तिमा चढते आणि तो आपल्या फुलांचे सडे घालू लागतो. असाच ‘बहावा’सुद्धा फुलून येतो आणि तो आपल्या पिवळ्याधमक फुलांच्या राशीच्या राशी आपल्यासमोर ठेवू लागतो. फळांचा राजा आंबा याच काळात मोहरतो, फळतो आणि आपल्या रसाळ गोमट्या फळांनी लहान थोरांची, गरीब-श्रीमंताची रसना तृप्त करायला तयार सज्ज होतो. सगळीकडे उत्तमोत्तम गोष्टींची पखरण करणारा हा वसंत, त्याला कशाची कमतरता, सगळे अगदी व्यवस्थित, साग्रसंगीत व आपल्या उच्च अभिरुचीनुसार घडवतो. जसे मोगर्‍याचा सुगंध, आंब्याची डाळ, पन्हे, वाळ्याचे पडदे हा सारा थाट, ही व्यवस्था वसंताच्या आगमनाची चाहूल असते.

एकूणच हा सृष्टीचा सृजनोत्सव

चैत्राचे दिवस म्हणजे गावोगावी होणाऱ्या जत्रा-यात्रांचे दिवस. बहुतेक साऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा चैत्रातच आपणाला गावाकडे खेचून नेतात. कुठे गोडा नैवेद्य तर कुठे खारा. पण एकूण गोतावळा गोळा करणे हेच या साऱ्यात चैत्राच्या साक्षीने होणारे आनंदाचे एक महोत्सवी स्वरूपाचे काम असते, असे वाटते. चैत्रमासाचे आपल्या सांस्कृतिक जगण्याशी फार उत्कट नाते आहे. गाड्यांना तोबा गर्दी असली तरी याच दिवसांत पर्यटन बहरत असते. त्यामुळे चैत्राचा उदय म्हणजे साऱ्यानाच नवी उमेद आणि नवा उत्साह, त्यातून फुलत जाणारे उत्सव-समारंभ, फुलांची होत राहणारी बरसात आणि नवलाई ल्यालेली पालवीची झाडे, एकूणच हा सृष्टीचा सृजनोत्सव असतो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा