Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:11 IST2025-10-04T13:08:51+5:302025-10-04T13:11:01+5:30
Astro Tips: नवरा बायकोचे नाते दृष्टावले,हे कसे ओळखावे आणि दृष्ट कशी काढावी याचा सोपा विधी जाणून घ्या आणि दर शनिवारी हा उपाय करा.

Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?...' एखादं छानसं जोडपं पाहिलं की हे गाणं चटकन आठवतं. कारण जिथे प्रेम, सामंजस्य आणि समाधान असतं तेच नातं रुजतं, फुलतं आणि बहरतं सुद्धा! मात्र अशा जोडप्यांना समाजाची दृष्ट लागण्याची शक्यता असते. दृष्ट, नजर किंवा नकारात्मक ऊर्जा असं आपण म्हणू शकतो. ज्यामुळे छान गुडी गुडी चाललेला संसार अचानक क्लेशदायक होतो आणि नातं दृष्टावतं!
हे ओळखावं कसं?
>> क्षुल्लक कारणावरून वाद आणि आठवडाभर अबोला
>> आर्थिक नुकसान
>> आजारपण
>> फसवणूक
>> एकमेकांवर संशय
>> संवादाचा अभाव
>> तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप
या सारख्या गोष्टी वाळवी होऊन नातं पोखरायला सुरुवात करतात आणि एक दिवस त्याचे मोठे भगदाड होते आणि नातं तुटण्यापर्यंत मजल जाते. त्यामुळे या गोष्टी नात्यात घडू लागल्या की वेळीच नात्याची डागडुजी करावी आणि दर शनिवारी हा उपाय करावा. दोघांपैकी कोणी एकाने हा उपाय केला तरी चालू शकेल. ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी दिलेला उपाय जाणून घेऊ.
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
>> कोणत्याही शनिवारी हा उपाय सुरु करून पुढच्या शनिवारपर्यंत हा उपाय करावा.
>> कागदाच्या दोन पुड्यांमध्ये प्रत्येकी सात लवंग ठेवा आणि एक पुडी नवऱ्याच्या आणि दुसरी पुडी बायकोच्या उशीखाली ठेवा.
>> पुढच्या शनिवारी दोन्ही पुड्या घेऊन होम पात्रात लवंगा टाका आणि त्यात भीमसेनी कापूर घालून जाळून टाका.
>> तयार झालेली राख वाहत्या पाण्यात किंवा घरापासून दूर टाकून द्या.
>> त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होईल आणि नाते सुधारण्यास मदत मिळेल.
>> पहा व्हिडीओ -