Astro Tip: तुळस अचानक वेगाने वाढण्यामागे दडलेत 'हे' शुभ संकेत; वाचा ज्योतिषशास्त्रातील थक्क करणारे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:02 IST2026-02-21T11:54:50+5:302026-02-21T13:02:30+5:30
Astro Tips: तुळशीची पूजा नित्यनेमाने घरात होते, तिची निगाही राखली जाते, पण एकाएक तिची वाढ होण्यामागे दडलेले असतात मोठ्या बदलाचे संकेत!

Astro Tip: तुळस अचानक वेगाने वाढण्यामागे दडलेत 'हे' शुभ संकेत; वाचा ज्योतिषशास्त्रातील थक्क करणारे खुलासे
हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक वनस्पती नाही, तर साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात तुळशीच्या स्थितीवरून भविष्यातील घटनांचे संकेत मिळतात, असे मानले जाते. अनेकदा आपण पाहतो की, खूप काळजी घेऊनही तुळस सुकते, तर कधी अचानक ती वेगाने फोफावू लागते. तुळशीची ही अचानक होणारी वाढ नेमके काय सुचवते, ते पाहूया:
१. घरात सुख-समृद्धीचे आगमन
जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप अचानक हिरवेगार झाले आणि त्याची वाढ वेगाने होऊ लागली, तर हा अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तिथे माता लक्ष्मीचा वास होणार आहे. हे आर्थिक प्रगतीचे लक्षण मानले जाते.
२. बुध ग्रहाची मजबूती
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशीचा संबंध 'बुध' ग्रहाशी आहे. बुध हा बुद्धी, व्यापार आणि वाणीचा कारक आहे. तुळशीची चांगली वाढ होणे म्हणजे तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होत आहे. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन व्यवसायात यश मिळण्याचे योग येतात.
३. कुटुंबातील कलह दूर होणे
हिरवीगार आणि वेगाने वाढणारी तुळस घरातील सकारात्मकतेचे प्रतीक आहे. जर तुमच्या घरात आधी सतत भांडण किंवा तणाव असेल आणि अशात तुळस बहरली, तर समजून जा की लवकरच कुटुंबात प्रेम आणि सलोखा वाढणार आहे.
Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, घरातली तुळस वाळली म्हणजे तुमच्या कुटुंबावरील मोठं विघ्न टळलंय!
४. शुभ कारण्याचे संकेत
अचानक तुळस वाढणे हे घरात एखादे मंगल कार्य (उदा. लग्न, मुंज किंवा घराचे काम) ठरण्याचे संकेत असू शकतात. बाप्पाच्या किंवा विष्णूच्या कृपेने तुमच्या कर्माचे चांगले फळ मिळण्याची ही वेळ असते.
या गोष्टींची काळजी घ्या:
मंजिरी येणे: तुळशीला खूप जास्त मंजिरी आल्यास, त्या वेळोवेळी काढून टाकणे गरजेचे असते. असे मानले जाते की मंजिरीचा भार तुळशीवर राहणे शुभ नसते, त्या काढल्याने तुळस अधिक वेगाने आणि निरोगी वाढते.
पाणी घालण्याचे नियम: तुळशीला प्रमाणाबाहेर पाणी घालू नका. तसेच रविवारी आणि एकादशीला तुळशीला स्पर्श करणे किंवा पाणी घालणे टाळावे.