आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:45 IST2025-06-26T19:43:59+5:302025-06-26T19:45:02+5:30
Ashadh Gupta Navratri 2025: आषाढ प्रतिपदा ते नवमी वराही देवीचे गुप्त नवरात्र सुरू झाले आहे, या काळात केलेली उपासना लवकर फळते, त्याबद्दल जाणून घेऊ.

आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
>> योगेश काटे, नांदेड
आजपासून आषाढ महिना सुरु झाला व त्यासोबत वराही देवीचे आषाढी गुप्त नवरात्र(Ashadh Gupta Navratri 2025) सुरु झाले आहे. हिंदु कालगणनेप्रमाणे हा चौथा महिना या महिन्याचे प्राचीन नाव शुचि आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्रास चंद्र असतो म्हणून याला आषाढ हे नाव पडले. सूर्य मिथुन राशीत असताना आषाढास सुरुवात होते. कर्कसंक्रमणास सुरुवात आणि मकरसंक्रमणापर्यंत दक्षिणायन असते. या महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर असतो म्हणजे बोली भाषेत आषाढी झड असंही म्हणतात. या महिन्यात तीन वेळा आखाड तळणं करण्याची प्रथा मराठवाड्यात आहे. या महिन्यात मूळ नक्षत्री चंद्र असतो त्या दिवशी बेंदूर सण साजरा करतात. कोकणात आषाढ शु. तृतीया या तिथीला गुरांची पुजा केली जाते.
Astrology: शुक्रवारी गौरी योगात पाच राशींवर लक्ष्मीकृपा होणार; धनधान्याची काळजी मिटणार!
- या महिन्यातील महत्वाच्या तिथी आणि लवकर विवाह होण्यासाठी करावयाचे उपाय जाणून घेऊ.
- आषाढ शु.प्रतिपदा गुप्तनवरात्र सुरुवात, तसैच टेंबे स्वामी यांचा समाराधना दिन.
- आषाढ शु. द्वितीयेस जगन्नाथ रथयात्रा
- आषाढ शु. एकादशी ( देवशयनी) चातुर्मास सुरुवात.
- आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा ( व्यासपुजा)
- आषाढ वद्य पंचमी प.बंगाल व उ.भारतात मनसा पंचमी म्हणतात हि नाग देवता म्हणुन पुजा करतात.
- आषाढ अमावस्या दीपपुजन
- दिव्यांची अमावस्या.
विवाहेच्छुक मंडळींनी आषाढ मासात केलेली उपासना लवकर फळते, ती कशी करायची ते जाणून घेऊ.
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
अविवाहित मुलींसाठी उपाय :
>> ज्या मुलींची लग्ने होत नाहीत त्यांनी आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीमध्ये सकाळी पाण्यात हळद टाकून स्नान करावे. यानंतर जमिनीवर आसन घालून बसावे. उत्तरेकडे तोंड करून देशी तुपाचा दिवा लावा. मग माता कात्यानी मातेचा पुढे दिलेला मंत्र म्हणावा -
महामाये महायोगिन्यधीश्वरी। नन्दगोपसुतं देवी, पति मे कुरु ते नमः।।
>> यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथीही मिळेल.
अविवाहित पुरुषांसाठी उपाय :
>> ज्योतिषशास्त्रानुसार ज्या पुरुषांचे लग्न होत नाही त्यांनी गुप्त नवरात्रीमध्ये कुलदेवीची रोज पूजा करावी. तसेच पुढील मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानु सारिणीम्। तारिणींदुर्गसं सारसागरस्य कुलोद्भवाम्
>> या उपासनेमुळे योग्य वधू मिळण्यास मदत होईल. तसेच विवाहाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!