अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: अंगारकी ते माघी गणेश जयंती: १७ दिवसांत नशिबाला कलाटणी देणारा १ प्रभावी उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:57 IST2026-01-05T16:55:53+5:302026-01-05T16:57:19+5:30
Angarak Sankashta Chaturthi 2026: ६ जानेवारी रोजी २०२६ मधील पहिली संकष्टी आहे आणि तीदेखील अंगारक योगाची, या दिवसापासून पुढील १७ दिवस पुढील उपासना करा आणि लाभ मिळवा!

अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: अंगारकी ते माघी गणेश जयंती: १७ दिवसांत नशिबाला कलाटणी देणारा १ प्रभावी उपाय!
२०२६ सालाची सुरुवात गणेश भक्तांसाठी अत्यंत मंगलमय आणि शुभ संकेत घेऊन आली आहे. ६ जानेवारीची अंगारकी संकष्टी आणि २२ जानेवारीचा माघी गणेश जन्मोत्सव या दोन मोठ्या पर्वांच्या निमित्ताने 'इच्छापूर्तीचा सुवर्णकाळ' चालून आला आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: १२ राशींपैकी बाप्पाची कृपा कोणावर? कोणाला फायदा? कोणाला तोटा?
गणपती बाप्पा हे 'विघ्नहर्ता' आणि 'सुखकर्ता' आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ६ जानेवारी रोजी मंगळवारी संकष्ट चतुर्थी आल्यामुळे 'अंगारक योग' तयार झाला आहे. हा योग अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी मानला जातो. या अंगारकीपासून ते २२ जानेवारीच्या माघी गणेश जयंतीपर्यंत (गणेश जन्म) असा १७ दिवसांचा हा काळ भक्तांसाठी वरदान ठरणार आहे.
६ जानेवारी: अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपाय
अंगारक संकष्ट चतुर्थीला केलेल्या पूजेचे फळ अनेक पटीने मिळते. या दिवशी काय करावे?
पूजा विधी: सकाळी लवकर स्नान करून गणेश पूजन करावे. बाप्पाला प्रिय असलेल्या २१ दुर्वा, लाल जास्वंदाचे फूल आणि गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा.
व्रत आणि पठण: दिवसभर कडक किंवा फलाहार उपवास करावा. बाप्पा समोर बसून 'अथर्वशीर्ष' किंवा 'संकटनाशन स्तोत्राचे' ११ वेळा मनोभावे पठण करावे.
संकल्प: पूजा करताना आपला संकल्प सोडावा. यामुळे शारीरिक व्याधी, मानसिक ताण, आर्थिक अडथळे आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊन सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतील.
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या मुली असतात निसर्गतः देखण्या आणि आकर्षक
६ ते २२ जानेवारी: मंत्राचा अमोघ प्रभाव
ज्योतिष अभ्यासक शुभम लोकरे गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार, केवळ अंगारकीचा दिवसच नाही, तर त्यानंतरचे १६-१७ दिवस महत्त्वाचे आहेत.
विधी: ६ जानेवारीपासून २२ जानेवारीपर्यंत रोज सकाळी किंवा संध्याकाळी 'ओम गं गणपतये नमः' या प्रभावी मंत्राचा १०८ वेळा (एक माळ) जप करावा.
फळ: माघी गणेश जन्मापर्यंत हा जप नियमित केल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. तुमची जी काही प्रामाणिक इच्छा असेल, ती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास गुरुजींनी व्यक्त केला आहे.
या कालखंडातील उपासनेचे लाभ
१. अडलेली कामे: कोर्ट-कचेरी, जमीन किंवा नोकरीतील अडलेली कामे मार्गी लागतील.
२. आर्थिक वृद्धी: कर्जाचा डोंगर कमी होण्यास आणि उत्पन्नाचे स्रोत वाढण्यास मदत होईल.
३. कौटुंबिक शांती: घरातील भांडणे मिटून सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
पाहा व्हिडिओ -