आमलकी एकादशी २०२६: आवळ्याच्या शीतल छायेत दडलंय तुमच्या आरोग्याचं आणि भाग्याचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 07:05 IST2026-02-27T07:00:01+5:302026-02-27T07:05:01+5:30

Amalaki Ekadashi 2026: निसर्गाच्या सान्निध्यात अक्षय आनंद! आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाखाली फलाहार करण्यामागील शास्त्र.

Amalaki Ekadashi 2026: The secret to your health and fortune lies in the cool shade of Amla! | आमलकी एकादशी २०२६: आवळ्याच्या शीतल छायेत दडलंय तुमच्या आरोग्याचं आणि भाग्याचं रहस्य!

आमलकी एकादशी २०२६: आवळ्याच्या शीतल छायेत दडलंय तुमच्या आरोग्याचं आणि भाग्याचं रहस्य!

आज २७ फेब्रुवारी, आमलकी एकादशी(Amalaki Ekadashi 2026). निसर्गाच्या सान्निध्यात राहून अक्षय आनंदाची अनुभूती देणारा हा दिवस. हिंदू धर्मात आवळ्याच्या वृक्षाला (Amalaki) केवळ झाड न मानता 'धात्री' म्हणजेच जगाचे पालनपोषण करणारी माता मानले गेले आहे. या एकादशीनिमित्त आवळ्याचे आध्यात्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व जाणून घेऊया.

आमलकी एकादशी २०२६: 'या' ७ राशींना होणार धनलाभ, तर ५ राशींना सावधतेचा इशारा!

पौराणिक संदर्भ आणि उत्पत्ती

आवळ्याच्या उत्पत्तीची कथा अत्यंत भावस्पर्शी आहे. जेव्हा संपूर्ण पृथ्वी जलमय होती आणि सृष्टीची निर्मिती होत होती, तेव्हा ब्रह्मदेव परब्रह्माच्या तपश्चर्येत लीन होते. भक्तीच्या भरात त्यांच्या डोळ्यांतून जे अश्रू गळले, त्यातूनच या दिव्य वृक्षाची उत्पत्ती झाली, अशी मान्यता आहे.

दुसरीकडे, देवी लक्ष्मीने याच वृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली होती. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांनी तिला दर्शन दिले. तेव्हापासून या वृक्षावर हरि-हराचा (विष्णू आणि शिव) वास असतो, असे मानले जाते.

पूजेचा विधी आणि 'धात्री' मंत्र

स्नान: आजच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

पूजन: आवळ्याच्या वृक्षाची पूजा करताना 'ओम धात्र्ये नम:' या मंत्राचा उच्चार करावा.

प्रदक्षिणा आणि नैवेद्य: यथासांग पूजा करून वृक्षाला प्रदक्षिणा घालावी, दिवेलागण करावी आणि मनातील शांततेसाठी प्रार्थना करावी.

फलाहार: या दिवशी पूजेनंतर आवळ्याच्या झाडाच्या शीतल छायेत बसून फलाहार करण्याचा प्रघात आहे.

आमलकी एकादशी २०२६: आर्थिक चणचण पाचवीला पुजलीये? २७ फेब्रुवारी रोजी करा आवळ्याचा 'हा' उपाय!

पर्यावरणाचे भान: देशी झाडांची जपणूक

आज आपल्या आजूबाजूला विदेशी झाडांची गर्दी झाली आहे. अशा वेळी आमलकी एकादशीसारख्या उत्सवांच्या निमित्ताने आपण देशी झाडांची, विशेषतः 'वृक्ष पंचवटी'ची (वड, पिंपळ, बेल, अशोक आणि आवळा) लागवड केली पाहिजे. केवळ झाड लावणे पुरेसे नाही, तर त्याचा विस्तार लक्षात घेऊन त्याची निगराणी आणि पालनपोषण करणे ही काळाची गरज आहे.

आयुर्वेदातील 'अमृत फळ'

आवळा हे खऱ्या अर्थाने 'अमृत फळ' आहे. त्यातील गुणधर्म कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत:

क जीवनसत्त्व: आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

उपयोग: हिवाळ्यात शक्तीवर्धनासाठी मोरावळा, लोणचे, सरबत किंवा कॅन्डीच्या स्वरूपात याचे सेवन करावे.

आरोग्य: पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणानंतर आवळा कॅन्डी आणि प्रवासात मळमळत असल्यास आवळा सुपारी रामबाण ठरते.

सौंदर्य: केसगळतीवर आवळा तेल अत्यंत गुणकारी आहे.

Palmistry: फक्त नशीबवान लोकांच्याच मनगटावर असते 'ही' चौथी रेघ; दर्शवते अफाट प्रसिद्धी आणि अमाप संपत्ती!

सारांश:

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी बलवर्धक असणारा आवळा, निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. त्याची पूजा करणे आणि त्याच्या सान्निध्यात वेळ घालवून मनाला शितलता मिळवणे, हाच आमलकी एकादशीचा खरा हेतू आहे.

Web Title : आमलकी एकादशी 2026: आंवले की छाया में स्वास्थ्य और भाग्य!

Web Summary : आमलकी एकादशी आंवला पेड़ के आध्यात्मिक और स्वास्थ्य लाभों का उत्सव है। ब्रह्मा के आँसुओं से उत्पन्न और लक्ष्मी द्वारा प्रिय, यह पेड़ विष्णु और शिव का प्रतीक है। पूजा में आंवला रस से स्नान, 'ओम धात्र्ये नमः' का जाप और आंवला का सेवन शामिल है। यह प्रतिरक्षा बढ़ाता है, पाचन में मदद करता है और बालों को स्वस्थ बनाता है, प्रकृति के महत्व पर जोर देता है।

Web Title : Amalaki Ekadashi 2026: Health and fortune in Amla's shade!

Web Summary : Amalaki Ekadashi celebrates the Amla tree's spiritual and health benefits. Originating from Brahma's tears and favored by Lakshmi, the tree embodies Vishnu and Shiva. Worship includes bathing with Amla juice, chanting 'Om Dhatrye Namah,' and consuming Amla. It boosts immunity, aids digestion, and promotes healthy hair, emphasizing nature's value.