शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Akshaya Tritiya 2021: अक्षय्य तृतीयेला ग्रहांचा अद्भूत संयोग; जुळून येतोय शुभ, लाभदायक धनयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 8:34 PM

Akshaya Tritiya 2021: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीचा शुभ मुहूर्त, ग्रहांचा अद्भूत योग यांविषयी जाणून घ्या...

मराठी वर्षातील साडेतीन मुहुर्तांमधील एक म्हणजे अक्षय्य तृतीया. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. अक्षय्य तृतीयाला युगदि तिथि असे म्हणतात. या दिवशी केलेले पुण्य आणि धर्म अक्षय्य आहे. अक्षय्य तृतीयेवर लोक सोन्याची खरेदीही करतात. असे मानले जाते की, या दिवशी सोने खरेदी केल्यास संपत्तीत वाढ होते. या दिवशी ग्रहांचा अद्भूत योग जुळून येत आहे. अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त, ग्रहांचा अद्भूत योग यांविषयी जाणून घेऊया... (akshaya tritiya 2021 know about amazing auspicious shubh yoga and muhurat on akshaya tritiya)

यंदा सन २०२१ मध्ये शुक्रवार, १४ मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. विशेष बाब म्हणजे यावर्षी ही तिथी अहोरात्र असेल. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत आहे. (shubh muhurat on akshaya tritiya) अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला, असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही, अशी मान्यता आहे. या दिवसापासून चारधाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची मंदिरे भाविकांसाठी खुली केली जातात. या तिथीला  नर-नारायण आणि परशुराम, यांचे अवतरण झाले होते, अशी मान्यता आहे. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता, असेही म्हटले जाते. 

कधी आहे परशुराम जयंती? रामाचे अस्त्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचवणारे भृगुनंदन

ग्रहांचा शुभ योग

यंदा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्य राशीपरिवर्तन करणार असून, मार्गी चलनाने मेष राशीतून वृषभ राशीत विराजमान होणार आहे. बुध ग्रहही याच वृषभ राशीत विराजमान असल्यामुळे बुधादित्य योग बुधादित्य योग जुळून येत आहे. याशिवाय शुक्र आणि चंद्रही याच राशीत असल्यामुळे शुभ योग जुळून येत आहे. (shubh yoga on akshaya tritiya)

धनयोगाचा शुभ संयोग

चंद्र आणि शुक्रचा जुळून येत असलेला संयोग धन, समृद्धी आणि गुंतवणुकीसाठी शुभफलदायी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच चंद्र सायंकाळनंतर मिथुन राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीत मंगळ ग्रह विराजमान आहे. या दोन्ही ग्रहांमुळे धनयोग निर्माण होत आहे. 

यंदाची अक्षय्य तृतीया लाभदायी ठरावी, म्हणून करा हे पाच सोपे उपाय!

या गोष्टीचे दान ठरेल पुण्यदायक

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे, साखर, गूळ, बर्फी, वस्त्रे, फळे, मीठ, सरबत, तांदूळ, चांदी दान करणे अत्यंत शुभ ठरते. तसेच नवीन संवत्साराच्या पंचांगाचे आणि धार्मिक पुस्तके व फळांचे दान केल्याने पुण्य वाढते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीयेला वसंत ऋतूचा शेवट आणि ग्रीष्म ऋतूची सुरुवात मानली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही पंचांगविना करता येते आणि कोणतीही वस्तू खरेदी केली जाऊ शकते. परंतु, तरीही अक्षय्य तृतीयेला आपण विशेष मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ लाभदायक मानले जाते. सकाळी ७.३० ते ९.४३ मिनिटे, दुपारी १२.१० ते सायंकाळी ४.३९ मिनिटे आणि सायंकाळी ६.५० ते रात्रौ ९.०८ मिनिटे या कालावधीत सोने खरेदी करावी, असे सांगितले जाते. मात्र, सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेदरम्यान राहु काळ असल्यामुळे या कालावधीत शुभ कार्य किंवा खरेदी टाळावी, असे म्हटले जात आहे.  

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीया