४०० वर्ष जुने वाल्मिकी रामायण अयोध्येत राम मंदिरात स्थापित; गुढीपाडव्याला राष्ट्रपती रामचरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:24 IST2026-02-03T13:23:48+5:302026-02-03T13:24:02+5:30

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या सुमारे ४०० कामगारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

400 year old valmiki ramayana installed in ram temple in ayodhya president draupadi murmu will visit on gudi padwa | ४०० वर्ष जुने वाल्मिकी रामायण अयोध्येत राम मंदिरात स्थापित; गुढीपाडव्याला राष्ट्रपती रामचरणी

४०० वर्ष जुने वाल्मिकी रामायण अयोध्येत राम मंदिरात स्थापित; गुढीपाडव्याला राष्ट्रपती रामचरणी

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतासह जगभरातून कोट्यवधि भाविक रामचरणी नतमस्तक झाले. अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रामललाचे दर्शन घेण्याची आस आजही भाविकांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच ४०० वर्ष जुने वाल्मिकी रामायण अयोध्येतील राम मंदिरातील रामललाचरणी स्थापित केल्याचे सांगितले जात आहे. 

देशातील विविध प्रांतांमधून वाल्मिकी रामायणातील प्राचीन हस्तलिखिते आणि प्रादेशिक भाषांमधील दुर्मिळ ग्रंथ मंदिर ट्रस्टला दान केले जात आहेत. केंद्रीय संस्कृत विद्यापीठातील वाल्मिकी रामायणाचा ४०० वर्षे जुना संस्कृत ग्रंथ ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिल्लीहून आणला होता, जो राष्ट्रपती संग्रहालयातून ट्रस्टला सादर करण्यात आला. हा ग्रंथ राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील गर्भगृहात ठेवण्यात येईल. लवकरच रामायण तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली जाईल. या ग्रंथांची सत्यता तपासली जाणार आहे. 

४०० कामगारांचा द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान

नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, सर्व काम अंतिम टप्प्यात आहे आणि निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल. रामललाचे तात्पुरते मंदिर फेब्रुवारीपर्यंत तयार होईल. हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा १९ मार्च रोजी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सहमती दर्शविली आहे. त्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राम मंदिरात पूजा करणार आहेत. तसेच राम मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या सुमारे ४०० कामगारांचा सन्मान करतील.

दरम्यान, राम मंदिराशी संबंधित उर्वरित सर्व बांधकाम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर, मुख्य बांधकाम संस्था, एलअँडटी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही जागा मंदिर ट्रस्टला सोपवतील. मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत एकूण अंदाजे ₹१,९०० कोटी खर्च झाले आहेत, त्यापैकी ₹१,६०० कोटी (जीएसटीसह) भरण्यात आले आहेत. मुख्य मंदिराचे बांधकाम खूप पूर्वी पूर्ण झाले आहे. आता राम मंदिर परिसर आणि इतर सुविधा अंतिम टप्प्यात आहेत.

 

Web Title : अयोध्या राम मंदिर में 400 साल पुराना वाल्मीकि रामायण स्थापित

Web Summary : अयोध्या के राम मंदिर में 400 साल पुराना वाल्मीकि रामायण स्थापित किया गया। गुड़ी पड़वा पर राष्ट्रपति मुर्मू दौरा करेंगी। मंदिर का निर्माण लगभग पूरा हुआ, ₹1,900 करोड़ खर्च हुए। 400 श्रमिकों को सम्मानित किया जाएगा।

Web Title : Ancient Valmiki Ramayana Installed in Ayodhya Ram Temple

Web Summary : A 400-year-old Valmiki Ramayana has been installed at Ayodhya's Ram Temple. President Murmu will visit on Gudi Padwa. The temple construction nears completion, with a ₹1,900 crore expenditure. 400 workers will be honored.