भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:03 AM2019-02-22T00:03:20+5:302019-02-22T00:04:01+5:30

धारुर तालुक्यातील असोला येथील ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या विविध योजनांमध्ये तब्बल ८० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला. याबाबत तक्रार करूनही यावर कसलीच कारवाई झाली नाही म्हणून गावातील माजी ग्रा.पं.सदस्याने जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Youth's autobiography attempted for corruption | भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेत खळबळ : हातात रॉकेलची बाटली घेऊन तो इमारतीवर चढला

बीड : धारुर तालुक्यातील असोला येथील ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या विविध योजनांमध्ये तब्बल ८० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला. याबाबत तक्रार करूनही यावर कसलीच कारवाई झाली नाही म्हणून गावातील माजी ग्रा.पं.सदस्याने जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. गुरूवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरूणाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाळासाहेब अण्णासाहेब चोले (२९ रा.असोला, ता.धारुर) असे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. १४ महिन्यांपूर्वी चोले यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून ८० लाख रूपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार केली होती. याची दखल न घेतल्याने त्यांनी उपोषण केले. यावेळी त्यांना सात दिवसांत चौकशी करून कारवाई केली जाईल, असे अश्वासन दिले होते. मात्र हे केवळ अश्वासनच राहिले. त्यानंतर आता १८ फेब्रुवारी रोजी पुन्हा तक्रार देत आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे गुरूवारी सकाळी चोले हे जि.प.मध्ये आले आणि इमारतीवर चढले. याचवेळी त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सपोनि बिपीन शेवाळे, पो.शि.मिलींद शेनकुडे, पो.ना. आशिष वडमारे, पो.ना.भागवत सानप, पो.शि. शहेंशाह यांनी तात्काळ जि.प.मध्ये धाव घेत त्यांना ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात शिवाजीनगर ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
ग्र्रामसेवक निलंबित, तिघांकडून वसुली होणार
आसोला येथील बालासाहेब चोले यांनी ग्रामपंचायतच्या निधी वापरात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीत संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायतच्या निधीचा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर संबंधित शाखा अभियंता, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर अपहारित रक्कम निश्चित करुन त्यांच्याकडून वसूल करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
तसेच शाखा अभियंत्यावर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. सुनील भोकरे यांनी सांगितले.
दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी घडलेल्या घटनेप्रकरणी प्रशासनास वेठीस धरुन कार्यालयीन कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी बालासाहेब चोले विरुद्ध पोलीस कारवाईबाबत जि.प. प्रशासनाने पत्र दिले.

Web Title: Youth's autobiography attempted for corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.