young man killed while visiting mother in Ashti | आईला भेटून परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला
आईला भेटून परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला

ठळक मुद्देआईची भेट ठरली अखेरचीबेलगांव आष्टी रोडवरील घटना

कडा :  गावाकडे राहणाऱ्या आईला भेटून परतणाऱ्या तरुणाचा अपघातात जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास आष्टी- बेलगांव रोडवर घडली. अशोक बबन गावडे ( 30 ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अशोक बबन गावडे हा खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. तो पत्नी मुलासोबत आष्टी येथे राहत होता. सोमवारी तो आईला भेटण्यासाठी खडकवाडी येथे दुचाकीवर आला होता. आईला भेटून अशोक रात्रीतून आष्टीकडे निघाला. मात्र, बेलगांव जवळ त्याच्या गाडीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात अशोक जागीच ठार झाली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक कैलास गुजर करीत आहेत.

Web Title: young man killed while visiting mother in Ashti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.