"तू सुरेश धसांसाठी काम करतो, गुंड आहेस?", सतीश भोसले आला समोर, 'त्या' व्हिडीओंबद्दल बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 22:51 IST2025-03-10T22:48:23+5:302025-03-10T22:51:24+5:30

Satish Bhosale Beed: एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सतीश भोसले चर्चेत आला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

You work for Suresh Dhas, are you a goon?, Satish Bhosale came forward and talked about viral videos | "तू सुरेश धसांसाठी काम करतो, गुंड आहेस?", सतीश भोसले आला समोर, 'त्या' व्हिडीओंबद्दल बोलला

"तू सुरेश धसांसाठी काम करतो, गुंड आहेस?", सतीश भोसले आला समोर, 'त्या' व्हिडीओंबद्दल बोलला

Satish Bhosale Viral Video: पोलीस शोध घेत असलेला सतीश भोसले समोर आला. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत सतीश भोसलेने मारहाणीचे समर्थने केले. जे अत्याचार करतात, त्यांना नागडे करून मारा, चौकात घेऊन मारा, हे फक्त सांगायलाच आहे का? असे हा सतीश भोसले म्हणाला. त्याचबरोबर पैसे उधळतानाच्या व्हिडीओबद्दलही त्याने स्पष्टीकरण दिले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलीस सतीश भोसलेचा शोध घेत आहेत. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सतीश भोसलेने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंवर खुलासे केले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने मारहाणीचे कारण सांगितले. 

सतीश भोसले म्हणाला, "दोन प्रकरणे आहेत. एक बॅटने मारलेलं प्रकरण. माझा मित्र माऊली खेडकरच्या पत्नीची तो माणूस वारंवार छेड काढत होता. त्यांचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करेन म्हणत होता. तू माझ्यासोबत काही गोष्टी करायला हो म्हणालीस, तर मी हा व्हिडीओ व्हायरल करणार नाही. त्यानंतर मला माऊलीने सांगितलं की, माझ्या घरी असा असा विषय झाला आहे. ते ऐकून माझं डोकं संतापलं. नंतर मी त्याला बॅटने मारहाण केली."

त्याला झापडा मारल्या तर काय फरक पडला?

"त्याला मारहाण करण्याचं खरं प्रकरण हे आहे. आणि त्याला वेगळं वळण दिलं जात आहे. जातीचं वळण दिलं जात आहे. काहीतरी राजकारण होतंय. तो आता बोललो की माझा काही विषय नाहीये. माऊलीकडे त्याचे व्हिडीओ आहेत. फोनपे ला पैसे पाठवल्याचे पुरावे आहेत. दहा लाखांना फसवलं आहे. त्याला माऊलीच्या पत्नीसोबत हे प्रकार करायचा होता का? तिने काही करून घेतलं असतं, तर मग सगळ्यांनी मेणबत्त्या घेऊन मूकमोर्चा काढायचा होता का? आज त्याला झापडा मारल्या तर काय फरक पडला? अत्याचार करतात त्यांना नागडं करून मारा, चौकात नेऊन मारा हे सांगायलाच आहे का? त्याला चार बॅट मारल्या म्हणून काय फरक पडला?", असे म्हणत सतीश भोसलेने मारहाणीचे समर्थन केले आहे. 

सुरेश धसांसाठी तू या गोष्टी करतो?

अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेवर सुरेश धसांचा माणूस असल्याचा आणि त्यांच्यासाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे. यावर सतीश भोसले म्हणाला की, "अंजली दमानियांना चुकीची माहिती पुरवतात. चुकीची माहिती पुरवल्यामुळे त्या तसे बोलतात. गुंड कशाला म्हणतात? माझे सामाजिक कार्याचे व्हिडीओ बघा ना तुम्ही. माझे इन्स्टाग्राम चेक केले नाही, फेसबुक चेक करत आहात."

"फेसबुक, इन्स्टाग्रामवर जे रील बनवतात, लाखो-कोटींचे लोक रील बनतात. मी एका छोट्या कुटुंबातील माणूस आहे. मला कारखान्याचे पैसे आले होते. आपल्याकडे पैसे आहेत, तर एखादा बनवू म्हणून मी ते बनवले. यात कसला माज? घरी बसल्या बसल्या व्हिडीओ बनवले", असे सतीश भोसले म्हणाला. 

Web Title: You work for Suresh Dhas, are you a goon?, Satish Bhosale came forward and talked about viral videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.