शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा, चिमुकल्यांवर उपचार अन् गर्भवतींची प्रसूती करायची कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:31 IST

बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने खाजगी डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयांचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करून कोरोनाबाधितांवर उपचार सुरू केले ...

बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने खाजगी डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयांचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करून कोरोनाबाधितांवर उपचार सुरू केले आहेत. यात बाल व स्त्री रुग्णालयांचा जास्त समावेश आहे. मागील काही दिवसांपासून ही संख्या गतीने वाढत आहे. ‘तुम्हीच सांगा, चिमुकल्यांवर उपचार अन् गर्भवतींची प्रसूती करायची कोठे?’ असा प्रश्न त्यामुळे आता सामान्यांमधून याच डॉक्टरांना विचारला जात आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्या ३४ हजारांच्या घरात पोहोचली आहे, तसेच मृत्यूही कमी होत नाहीत. वाढती रुग्णसंख्या पाहता शासकीय आरोग्य संस्थेत खाटांची संख्या अपुरी पडत आहे, तसेच काही लोकांचा शासकीय संस्थांवर विश्वास नसल्याने ते खाजगी रुग्णालयात जातात. रुग्ण भरतीमुळे खाजगी रुग्णालये वाढत आहेत. आरोग्य विभागाकडे कोरोना सेंटर तयार करण्यासाठी खाजगी डॉक्टर गर्दी करू लागले आहेत. ज्या रुग्णालयात कधी १० पेक्षा जास्त रुग्ण जात नव्हते, तेथे सद्य:स्थितीत खाटा अपुऱ्या पडत आहेत. रुग्णांची गरज पाहता खाजगी डॉक्टर नियमांपेक्षा जास्त बिल आकारून आर्थिक लूट करत आहेत. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून बाल, स्त्री रुग्णालयांचे रूपांतर हे खाजगी डॉक्टर कोविड सेंटरमध्ये करीत आहेत. नाव बाल व स्त्री रुग्णालयाचे अन्‌ उपचार कोरोनाबाधितांवर केले जात आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील जवळपास खाजगी रुग्णालयांतील खाटा पूर्ण झाल्या आहेत. नॉनकोविड हॉस्पिटल कोविडमध्ये रूपांतरित होत असल्याने इतर रुग्णालयांमध्ये गर्दी होत आहे, तसेच सामान्यांचेही हाल होत आहेत. आपत्तीच्या नावाखाली प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून लुटमार केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

एका फिजिशियनवर चार- चार हॉस्पिटलची जबाबदारी

कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात फिजिशियनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे अशा डॉक्टरांना जास्त मागणी होत आहे. कोविड सेंटरला परवानगी देताना फिजिशियनचा बाँड घेतला जात आहे. एका फिजिशियनने चार- चार रुग्णालयांसाठी बाँड लिहून दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले, तर काही फिजिशियन कंत्राटी पद्धतीने सरकारीत काम करून नंतर खाजगीत उपचार करीत असल्याचे सांगण्यात आले.

रेमडेसिविरसाठी नातेवाइकांच्या हाती चिठ्ठी

ज्या खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल आहे, त्याच रुग्णालयात सर्व औषधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे; परंतु हे खाजगी डॉक्टर रेमडेसिविरच्या इंजेक्शनची चिठ्ठी लिहून नातेवाइकांच्या हाती ठेवत आहेत. यात त्यांची धावपळ होत आहे, तर दुसऱ्या बाजूला औषधी मिळत नसल्याची धास्ती घेऊन रुग्णांची प्रकृती अधिकच खालावत असल्याचे सांगण्यात येत आहे. खाजगी डॉक्टर मात्र, केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

नॉनकोविड रुग्णालयांतही गर्दी

जिल्ह्यातील खाजगी बाल व स्त्री रुग्णालयांचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर होत असल्याने आहे त्या नॉनकोविड रुग्णालयांमध्ये गर्दी होत आहे. रुग्णांची गर्दी असल्याने त्यांना तासन्‌तास बसावे लागते. जिल्हा रुग्णालयातही प्रसूती व ओपीडीची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

--

...अशी आहे आकडेवारी

जिल्ह्यातील एकूण कोविड संस्था ८२

शासकीय आरोग्य संस्था ३२

खाजगी संस्था ५०

===

एकूण खाटांची क्षमता ६,८३२

मंजूर खाटा ६,५५२

रिकाम्या खाटा ३,०५०