शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे उपोषण सुरूच; ग्रामसेवकाला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

गायरान हक्क अभियान : आंदोलनाचा इशारा अंबाजोगाई : मौजे धानोरा खुर्द येथील मागासवर्गीय कसत असलेल्या गायरानामधील पत्र्यांचे घर जाणूनबुजून ...

गायरान हक्क अभियान : आंदोलनाचा इशारा

अंबाजोगाई : मौजे धानोरा खुर्द येथील मागासवर्गीय कसत असलेल्या गायरानामधील पत्र्यांचे घर जाणूनबुजून ग्रामसेवक आणि सरपंच यांनी जमीनदोस्त केल्याप्रकरणी अंबाजोगाईचे गटविकास अधिकारी या ग्रामसेवकाला अभय देत असून उपोषण करीत असलेल्या महिलांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. दरम्यान, धानोरा खुर्द येथील उपोषण करणाऱ्या महिलांनी ग्रामसेवक आणि सरपंचावर जोपर्यंत कार्यवाही होत नाही, तोपर्यंत उपोषण न सोडण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, या प्रकरणात गायरान हक्क अभियान, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे, तर वंचित भूमिहीन संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मौजे धानोरा खुर्द येथील मागासवर्गीय कसत असलेल्या गायरानामधील पत्र्यांचे घर ग्रामसेवक आणि सरपंच यांनी जमीनदोस्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर ॲट्रॅासिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या ग्रामसेवकास बडतर्फ करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी धानोरा येथील गायरानधारकांनी ‌‌उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ जूनपासून उपोषण सुरू केले आहे.

आम्ही धानोरा खुर्द येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमिनीबाबत लढा देत आहोत. गावातील ग्रामसेवक, सरपंच यांनी इतर अतिक्रमणे सोडून जाणूनबुजून आम्ही लढा देत असलेल्या गायरान जमिनीवर झाडे लावण्याचा घाट घातला. जमिनीवर बांधलेल्या पत्र्यांचे घर पाडून त्या ठिकाणी जेसीबीने नांगरणी केली आहे.

गावात अनेकांनी गायरान जमिनी काबीज केल्या असून त्यांना सोडून दिले, असा आरोप निवेदनात केला आहे. या निवेदनावर सुरेखा वाघमारे, आशा वाघमारे, रिता कसबे, सरिता घाडगे, कोंडाबाई वाघमारे, सागरबाई वाघमारे, दैवशाला जोगदंड, मैनाबाई वाघमारे यांच्या सह्या अंगठे आहेत. यातील काही महिला वयस्कर आहेत, त्यांची प्रकृती खालावली आहे. तसा अहवाल तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे.

===Photopath===

220621\3010img-20210622-wa0126_14.jpg