शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विहिर आजपर्यंत कधीच आटली नाही

By admin | Updated: July 17, 2014 00:57 IST

अंबाजोगाई: पाऊस पडला नाही की, धरणे, नद्या, बोअर व विहिरीचे पाणी आटते.

अंबाजोगाई: पाऊस पडला नाही की, धरणे, नद्या, बोअर व विहिरीचे पाणी आटते. परंतु अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरातील विहिरीची गोष्टच निराळी आहे. ही विहीर केवळ २० फूट खोल असून, या विहिरीचा जलस्त्रोत आजपर्यंत कधीच आटला नाही. याचा आधार ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.जिल्ह्यात पाणीसमस्या दिवसेंदिवस बिकट बनली असतानाच जून महिन्यात येणारा पाऊस जुलै महिन्यात पडू लागला. त्यामुळे पाणीपातळी खालावली. आजघडीला ग्रामीण भागात तीनशे फुटापर्यंत बोअर घेऊनही पाणी लागत नाही. मात्र लोखंडी सावरगाव येथील विहीर वीस फूट आहे. या विहिरीला नेहमीच पाणी असते. कितीही उन्हाळे आले, गेले तरीही या विहिरीला पाणी कसे राहते? हा विषय अनेकांसाठी रहस्य बनलेला आहे. गावात जवळपास शंभर ते दीडशे बोअर आहेत. यावर्षी घेतलेल्या बोअरची संख्याही लक्षणीय आहे. अशी परिस्थिती असली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील विहिरीची किमया निराळी आहे. ७५ वर्षांपूर्वी खोदलेल्या विहिरीची खोली २० फुटांपेक्षा अधिक नाही. रुंदीही कमी आहे. अगदी सकाळी ५ वाजल्यापासून पाणी भरण्यास या विहिरीवर गर्दी होते. गेल्या तीन ते चार वर्षात अंबाजोगाई तालुक्यात पाणी समस्येत वाढ झाली आहे. मात्र लोखंडी सावरगाव येथील ग्रामस्थ या एकट्या विहिरीच्या भरवशावर असतात. निसर्गाच्या या किमयेने अनेकांची तहान तर भागवलीच, शिवाय या पाण्यावरच अनेक घरेही बांधली गेली. या पाण्याचा जलस्त्रोत कधीच आटला नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. (वार्ताहर)