अण्णा भाऊ साठे जयंती समिती अध्यक्षपदी वाघमारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:50+5:302021-07-13T04:07:50+5:30
बीड : सत्यशोधक अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहरची बैठक १० जुलै २१ रोजी शासकीय विश्रामगृह ...

अण्णा भाऊ साठे जयंती समिती अध्यक्षपदी वाघमारे
बीड : सत्यशोधक अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहरची बैठक १० जुलै २१ रोजी शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी करण्यासाठी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बप्पा सोनवणे हे उपस्थित होते. त्यासोबत बीड शहरातील ज्येष्ठ नागरिक, युवक उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी नगरसेवक गणेश वाघमारे, तर सचिवपदी आनंद चांदणे यांची निवड करण्यात आली.
कोरोनाचा धोका कायम असल्यामुळे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची जयंती छोटेखानी सामाजिक उपक्रम घेऊन ही परंपरा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करेल. सार्वजनिकरीत्या कार्यक्रमांना टाळून हा उत्सव करण्याचे ठरवले आहे. ही परंपरा खंडित होऊ नये, यासाठी हा जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरले. तसेच अजिंक्य चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होईल, असे सचिव यांनी बैठकीत सांगितले.
110721\154111_2_bed_11_11072021_14.jpg~110721\154611_2_bed_10_11072021_14.jpg
गणेश वाघमारे~आनंद चांदणे