Video: दोन तिकीट बुकिंग क्लार्कमध्ये वरिष्ठांसमोरच बाचाबाची; परळी रेल्वे स्थानकातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 18:08 IST2023-04-05T18:08:01+5:302023-04-05T18:08:33+5:30

परळी रेल्वे स्थानकावरील दोन बुकिंग क्लार्कमध्ये कांही कारणास्तव बाचाबाची झाली.

Video: Argument between two ticket booking clerks in front of seniors; incident in Parli Railway Station | Video: दोन तिकीट बुकिंग क्लार्कमध्ये वरिष्ठांसमोरच बाचाबाची; परळी रेल्वे स्थानकातील प्रकार

Video: दोन तिकीट बुकिंग क्लार्कमध्ये वरिष्ठांसमोरच बाचाबाची; परळी रेल्वे स्थानकातील प्रकार

परळी (बीड) : येथील रेल्वे स्टेशनच्या तिकीट आरक्षण कार्यालयामध्ये मंगळवारी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्या समोरच वाद होऊन बाचाबाची झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांत झालेली हाणामारी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

परळी रेल्वे स्थानकावरील दोन बुकिंग क्लार्कमध्ये कांही कारणास्तव बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांनी आपली तक्रार रेल्वे अधिकाऱ्याकडे येऊन केली. मात्र, त्या ठिकाणीही दोघांमधील वाद उफाळून आला. त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. या प्रकाराने काही काळ रेल्वे स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दोघांकडे तिकीट बुकिंगचे काम आहे. यातच त्यांच्यात वाद झाल्याने या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घावी अशी मागणी प्रवाश्यांतून होत आहे.

Web Title: Video: Argument between two ticket booking clerks in front of seniors; incident in Parli Railway Station