शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे भाविकांच्या अनुपस्थितीत झाले महाशिवरात्रीचे वैद्यनाथ पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 19:49 IST

महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथास बुधवारी रात्री 12 नंतर पूजा ,अभिषेक  करून अलंकार व फुलांनी सजावट करण्यात आली.

- संजय खाकरे

परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे मंदिर    कोरोना पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहे.  मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना दर्शनासाठी मंदिर परिसरात जाता आले नाही. मंदिर पायरीचे दर्शन सुद्धा घेता आले नसल्याने अनेक भाविक निराश होऊन आल्या पाऊली परत गेले. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथास बुधवारी रात्री 12 नंतर पूजा ,अभिषेक  करून अलंकार व फुलांनी सजावट करण्यात आली. त्यामुळे आकर्षकपणा आला होता. अलंकारिक पूजा असलेल्या फोटोचे  सोशल माध्यमातून अनेक भाविकांनी दर्शन घेतले.  

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने  येथील यात्रा महोत्सव रद्द करून 8 मार्च ते 16 मार्च दरम्यान मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे . मंदिर परिसरात एकही भाविक जाता कामा नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाने उपाय योजना केली आहे व परळी शहर पोलीस ठाणे ते वैद्यनाथ मंदिर रोड यादरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे त्यामुळे भाविकांना मंदिरात व मंदिराच्या पायऱ्या जवळ सुद्धा जाता आले नाही  मेरूप्रदक्षिणा मार्गावर मात्र भाविक सकाळपासून  येत जात होते. येथील वैद्यनाथ मंदिर जवळील श्री संत जगमित्र नागा मंदिर पायऱ्या चे दर्शन घेऊन भाविकांनी समाधान मानले. 

मध्यरात्री झाला अभिषेक आणि अलंकार पूजा महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथास बुधवारी रात्री 12 नंतर पूजा ,अभिषेक  करून अलंकार व फुलांनी सजावट करण्यात आली. त्यामुळे आकर्षकपणा आला होता. अलंकारिक पूजा असलेल्या फोटोचे  सोशल माध्यमातून अनेक भाविकांनी दर्शन घेतले. वैद्यनाथ मंदिराचे पुजारी श्री नीळकंठ पुजारी यांच्या हस्ते बुधवारी रात्री बारा वाजता महाशिवरात्री पूजा करण्यात आली. त्यानंतर साडेबारा वाजता वैद्यनाथ मंदिराचे पुरोहित अरुण आयाचित यांच्या हस्ते श्री वैद्यनाथास  नित्याचा अभिषेक करण्यात आला. यावेळी श्री वैद्यनाथास अलंकारांनी व फुलांनी सजविण्यात आले होते. अशी माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी दिली..    

व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका परळी ,महाशिवरात्रीनिमित्त भरण्यात येणारा यात्रा ऊत्सव यंदा रद्द केल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. महाशिवरात्री निमित्त  प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश, तेलंगणा कर्नाटक, गुजरात व अन्य राज्यातून  येणारे भाविक  गुरुवारी आले नाहीत. यंदा कोरोना पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदिर बंद ठेवण्यात आल्याने व यात्रा महोत्सव रद्द केल्याने परराज्यातील भाविक येथे दर्शनास आले नाही .त्यामुळे येथील  बेल फुल विक्रते, पेढे विक्रते, रिक्षा ,खेळनीचे साहित्य व मंदिर परिसरातील हॉटेल यांच्या व्यवसायावर परिणाम जाणवला. तसेच यात्रा महोत्सव नसल्याने  विविध प्रकारचे स्टॉल, रहाट पाळणे, मीना बाजार ,कुस्त्यांचे फड ,अश्व स्पर्धा , कृषी प्रदर्शन भरण्यात न आल्याने  अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. 

व्यापारी, भाविकांची खंत महाशिवरात्रीच्या पुण्य पूर्वकाळात वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्याचे दर्शन घेता येईल असे वाटले होते परंतु चोख पोलिस बंदोबस्त असल्याने पायऱ्याचेही  दर्शन घेण्यासाठी जाता आले नाही अशी खंत गणेश बद्दर या भाविकांनी व्यक्त केली. बाहेरचे भाविक न आल्याने परळीच्या बाजार पेठेतील कापड व्यवसायावर ही परिणाम जाणवला असे कापड व्यापारी गोपीनाथ शंकुर वार यांनी सांगितले. यात्रा ऊत्सव न भरल्याने कटलरी व्यवसाय यात्रेत भरवता आला नाही,त्यामुळे आर्थिक नुकसान झाले व बाजारात ही गुरुवारी व्यवसाय झाला नाही अशी माहिती व्यवसायिक सतीश बेलुरे यांनी दिली. 

टॅग्स :Beedबीड