‘वैद्यनाथ’कडून उसाला १४०० रुपयांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:35 IST2019-04-04T00:34:50+5:302019-04-04T00:35:41+5:30
तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी ऊसाला केवळ १४०० रुपये भाव दिल्यामूळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

‘वैद्यनाथ’कडून उसाला १४०० रुपयांचा भाव
परळी : तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी ऊसाला केवळ १४०० रुपये भाव दिल्यामूळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. तब्बल ६ महिन्यानंतर व तो ही केवळ १४०० रुपये भाव मिळाल्यामुळे दुष्काळात होरपळून निघणा-या शेतकरी जाम चिडले. या प्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी प्रशासनाला घेराव घालून जाब विचारला. मात्र याच शेतकºयांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आल्याने शेतकºयांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी कारखाना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकाही रुपयाचे बिल न दिल्याने शेतकरी दुष्काळात संकटात सापडला होता. मागील दोन दिवसात काही शेतकºयांच्या खात्यावर १४०० रुपये प्रति टन प्रमाणे पैसे जमा होऊ लागले होते. मात्र, १५ दिवसात पैसे देण्याचा नियम असताना ६ महिन्यांनी पैसे देणाºया कारखान्याने केवळ १४०० दिल्याने शेतकरी संतापले. शेतकºयांनी कारखान्यावर आंदोलन करत व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव यांना घेराव घातला.
दरम्यान, आंदोलन का केले म्हणुन शेतकºयांना पोलिसांनी नोटीसा बजावल्यामुळे शेतकºयांच्या रोषात भर पडली. जिल्ह्यातील इतर कारखाने दोन हजार रुपयांप्रमाणे १५ दिवसात पेमेंट देत असताना ऐन दुष्काळात शेतकºयाच्या जखमेवर मीठ चोळल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.