रोटरीने दिले वृद्धाश्रमाला उपयोगी साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:18+5:302021-07-05T04:21:18+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष विवेक गंगणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथअप्पा गिरवलकर, पवन गिरवलकर उपस्थित होते . आश्रमवासी पानगावकर ...

Useful materials given to the old age home by Rotary | रोटरीने दिले वृद्धाश्रमाला उपयोगी साहित्य

रोटरीने दिले वृद्धाश्रमाला उपयोगी साहित्य

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष विवेक गंगणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथअप्पा गिरवलकर, पवन गिरवलकर उपस्थित होते . आश्रमवासी पानगावकर यांनी जुन्या आठवणीला उजाळा दिला.

प्रा. दामोधर थोरात यांनी रोटरीच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. विवेक गंगणे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

प्रकल्प प्रमुख अरुण आसरडोहकर यांनी त्यांच्या पत्नी अलका आसरडोहकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आश्रमोपयोगी वस्तू आश्रमास भेट दिल्या. मोठे इडली कुकर, प्रेशर कुकर, मिक्सर, भांडे, पातेले, पंखे, चमचे, आदींचा यात समावेश होता. विकास अधिकारी राजेश भिलावे व प्रा. अजय पाठक यांनी बिस्कीट पुडे दिले. सुरुवातीला प्रा .रोहिणी पाठक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिवकुमार निर्मळे यांनी केले. जगदीश जाजू यांनी आभार मानले. यावेळी सुहास काटे, अनिरुद्ध चौसाळकर, डॉ. कल्पना मुळावकर, प्रा. सचिन कराड, स्वप्निल परदेशी, बाबूराव बाभूळगावकर, राजेश भिलावे, रोटरी सदस्य व आश्रमातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

उद्योगाची संकल्पना

वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांसाठी कापसाच्या वाती करण्याच्या उद्योगाची संकल्पना सचिव रोहिणी पाठक यांनी मांडून त्यासाठी कच्चा माल व बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी रोटरीने घेतली. त्यामुळे ज्येष्ठ महिलांना विरंगुळा मिळेल व आश्रमास उत्पन्न मिळू शकेल. आश्रमातील अनेक अडचणी असल्या तरी देणगीदारांमुळे त्या सुटतात, असे पवन गिरवलकर यांनी सांगितले.

040721\img-20210703-wa0104_14.jpg

Web Title: Useful materials given to the old age home by Rotary