शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकांत लालपरी चालकांची बेशिस्त; प्रवाशांना मनस्ताप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:36 IST

बीड : येथील बसस्थानकात जागा अपुरी असल्याने बसेस दाटीवाटीत उभ्या कराव्या लागतात तसेच फलाटावरही जागा नसल्याने अनेक बसेस आडव्या-तिडव्या ...

बीड : येथील बसस्थानकात जागा अपुरी असल्याने बसेस दाटीवाटीत उभ्या कराव्या लागतात तसेच फलाटावरही जागा नसल्याने अनेक बसेस आडव्या-तिडव्या बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. त्याचा मन:स्ताप प्रवाशांना करावा लागत आहे. आगारात काम सुरू असल्याने सर्व बसेस स्थानकातच उभा केल्या जात असल्याने अडचण होत आहे.

जिल्ह्यातील सर्वांत मोठे आगार बीड आहे. येथे बसेसची आवक जावक व संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु स्थानकावर केवळ सहाच फलाट होत. त्यामुळे बसेस उभा करायला अडचणी येतात. त्यातच सध्या बीड आगाराच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे आगारात उभा राहणाऱ्या सर्व बसेस आता स्थानकातच उभा असतात. आगोदरच स्थानकाची जागा अपुरी त्यातही आता आगारातील बसेस स्थानकात आल्याने बसेस उभा करायला जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बसेस आडव्या तिडव्या उभा राहत असल्याचे दिसते. त्यामुळे चालकांची तर अडचण आहेच, शिवाय प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गर्दीमुळे अपघाताची दाट शक्यता असून चालकांसह वाहकांसमोर काळजी घेण्याचे आव्हान आहे. हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी आगाराचे काम पूर्ण करून स्थानकही सुसज्ज करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

---

काय म्हणतात प्रवासी

बीड बसस्थानकासारखे घाणीचे साम्राज्य व बेशिस्त असलेले ठिकाण कुठेच सापडणार नाही. जागा अपुरी असली तरी स्वच्छता असायला हवी ना. येथे काहीच सुविधा नसतात; परंतु नाईलाजाने यावे लागते. यात सुधारणा करावी, एवढीच अपेक्षा आहे.

मंगेश काळे, औरंगाबाद

मी कोरोनानंतर चारवेळा या स्थानकात आलो. पाऊस असताना तर स्थानकाला तलावाचे स्वरूप येते. गुडघ्याएवढ्या पाण्यातून मार्ग शोधावा लागतो. त्यातच बसेसही आडव्या तिडव्या उभा असतात. मागे पुढे करताना अपघाताची भीती असते. रापमने अपघात टाळण्यासाठी काळजी घ्यावी.

पांडुरंग कुलकर्णी, बीड

---

बीड बसस्थानकात केवळ सहा प्लॅटफॉर्म आहेत. रोज जवळपास ६०० बसेसची आवक-जावक असते. त्यातच आगाराचे काम सुरू असल्याने स्थानकातच बसेस उभा कराव्या लागतात. यामुळे थोडी अडचण होत आहे. योग्य ती काळजी घेऊ.

एन.पवार, आगारप्रमुख, बीड

260821\26_2_bed_6_26082021_14.jpeg

बीड बसस्थानकात आडव्या तिडव्या बसेस उभा केल्या जात असल्याने प्रवााशांसह इतर बसेसला अडचण होत आहे. गुरूवारचे छायाचित्र.