ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:36 IST2019-03-23T00:35:29+5:302019-03-23T00:36:06+5:30
भरधाव ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील कचरु ज्योतिबा रेडे (रा. मोठेवाडी) हे जागीच ठार झाले तर जखमी झालेले दौलत सरकटे यांचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला.

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
गंगामसला : भरधाव ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील कचरु ज्योतिबा रेडे (रा. मोठेवाडी) हे जागीच ठार झाले तर जखमी झालेले दौलत सरकटे यांचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला.
कचरू ज्योतिबा रेडे (वय ६० वर्षे) व दौलत सरकटे हे दोघे बुधवारी रात्री माजलगाव येथून दुचाकीने (एम.एच. १३ -एबी १०८१) राष्ट्रीय महामार्ग ६१ सी वरुन मोठेवाडीकडे जात होते. खरात आडगाव फाट्याजवळ रात्री नऊ वाजता भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यात कचरु रेडे हे जागीच ठार झाले. दुचाकीवर सोबत असलेले दौलत सरकटे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ बीड येथे पाठवले होते. तेथे उपचार असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.