केज तालुक्यातून पुन्हा दोन मुली बेपत्ता; १४ वर्षांच्या मुलीसह १८ वर्षांच्या तरुणीचे अपहरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:21 IST2026-03-12T15:21:39+5:302026-03-12T15:21:59+5:30

केजमध्ये मुलींच्या बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच! तुकुचीवाडी आणि बोबडेवाडीतील घटना; पोलिसांकडून तपास सुरू

Two More Girls Go Missing from Kaij Taluka; 14-Year-Old Minor Kidnapped While Sleeping Next to Mother | केज तालुक्यातून पुन्हा दोन मुली बेपत्ता; १४ वर्षांच्या मुलीसह १८ वर्षांच्या तरुणीचे अपहरण?

केज तालुक्यातून पुन्हा दोन मुली बेपत्ता; १४ वर्षांच्या मुलीसह १८ वर्षांच्या तरुणीचे अपहरण?

केज (जि. बीड): केज तालुक्यातून दोन वेगवेगळ्या गावांतील दोन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये एक १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी असून दुसरी १९ वर्षांची तरुणी आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका तरुणीने आंतरजातीय विवाह केल्याचेही आता समोर आले आहे.

पहिली घटना: मध्यरात्री मुलगी गायब
तुकुचीवाडी येथील इयत्ता ८ वीत शिकणारी १४ वर्षांची मुलगी बुधवारी (११ मार्च) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आईजवळ झोपलेली होती. तिचे वडील शेतातून घरी परतले असता मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना: मजुरीचे पैसे देण्यासाठी गेली अन्...
बोबडेवाडी येथील १९ वर्षीय तरुणी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मजुरांचे पैसे देण्यासाठी गावात गेली होती, ती अद्याप घरी परतलेली नाही. नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या या तरुणीचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

आंतरजातीय विवाहाचा उलगडा
सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलींपैकी योगेश्वरी कोठावळे हिने भावठाणा येथील अभिषेक कापसे या तरुणासोबत आळंदी येथे राजीखुशीने आंतरजातीय विवाह केला आहे. ती सध्या सुखाने नांदत असल्याची माहिती अभिषेकचे वडील विलास कापसे यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय उमेश निकम या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : केज तालुका में फिर दो लड़कियाँ लापता; अपहरण का संदेह

Web Summary : बीड के केज तालुका से दो लड़कियाँ, 14 और 19 वर्ष की, लापता, चिंता बढ़ी। एक लड़की ने भागकर दूसरी जाति के लड़के से शादी की। पुलिस जाँच कर रही है।

Web Title : Two Girls Missing Again in Kej Taluka; Suspected Abduction

Web Summary : Two girls, 14 and 19, are missing from Kej Taluka, Beed, sparking concern. One eloped and married someone from a different caste. Police are investigating.