शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथ कारखाना गोदामातील चोरीप्रकरणी आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST

परळी : तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातून ३७ लाख रुपये किमतीचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी परळी ग्रामीण ...

परळी : तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातून ३७ लाख रुपये किमतीचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी आणखी दोन आरोपींना शुक्रवारी अटक केली आहे. या आरोपींमध्ये चोरांच्या टोळीतील एका वाहन चालकाचा समावेश आहे. या चोरी प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक झाली आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या गोदामातील ३७ लाख रुपये किमतीचे विविध साहित्य चोरून नेल्याची घटना ऑक्टोबरमध्ये घडली. याप्रकरणी २२ डिसेंबर रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कारखान्याच्या लिपिकाच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात परळी ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून २४ तासांच्या आत पाच आरोपींना अटक केली. या चोरी प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून, आणखी दोन आरोपींना शुक्रवारी अटक केली. त्यांना परळी न्यायालयात हजर केले असता दोघांना २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. परळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. चोरी प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास चालू आहे व कारखान्यात साहित्य चोरी करणारी ही एक टोळीच असल्याचे पुढे येत आहे. या टोळीचा म्होरक्या मात्र फरार आहे.