दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:41 AM2019-09-18T00:41:31+5:302019-09-18T00:42:10+5:30

दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

Two days a farmer commits suicide | दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या

दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील सात वर्षात तब्बल १३०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जनजागृती, योजनांचा लाभ दिला जात असतानाही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. या आत्महत्या रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश येत असल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यावर्षी तर पावसाळा संपत आला तरी एकही मोठा पाऊस झाला नाही. रिमझीम पावसावरच पेरण्या झाल्या. थोड्याफार झालेल्या पावसावर पिके कसे बसे जगविले.
खत, फवारणी हजारो रूपये खर्च केले. मात्र, एवढे असतानाही दुष्काळी परिस्थितीमुळे अद्यापही पीके जोमात आलेले नाहीत. त्यामुळे केलेला खर्च निघेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातूनच ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगण्यात येत आहे.
२०१३ ते १३ आॅगस्ट २०१९ पर्यंत जिल्ह्यात १३०३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ३०१ आत्महत्या २०१५ मध्ये झाल्या आहेत. २००४ ते २०१८ पर्यंत १८१५ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासनदरबारी आहे. पैकी १२०६ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत तर ६०९ प्रकरणे विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आलेली
आहेत.
४०३२ शेतकरी तणावग्रस्त
जिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागाच्यावतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून शेतकरी तणावाखाली आहेत का, याची माहिती घेतली जाते. मागील सहा महिन्यात ३ लाख ४६ हजार ७२७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ४ हजार ३२ शेतकरी तणाग्रस्त आढळले आहेत.
त्यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करून समुपदेशन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सुदाम मोगले, डॉ.मुजाहेद, परिचारिका विजया शेळके, अशोक मते, अंबादास जाधव, प्रियंका भोंडवे, शीतल टाक, महेश कदम, तांदळे हे यासाठी काम करीत आहेत.

Web Title: Two days a farmer commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.