गेवराईत मान्सून पूर्व पावसाच्या तडाख्यात घर कोसळून दोन मुले जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 19:11 IST2018-06-05T19:11:44+5:302018-06-05T19:11:44+5:30

आज पहाटे झालेल्या जोरदार पावसाच्या तडाख्याने शहरातील संजयनगर येथील मातीचे घर कोसळून दोन मुले किरकोळ जखमी झाली.

Two children injured in a collapsing house in Gavrai due to heavy rain | गेवराईत मान्सून पूर्व पावसाच्या तडाख्यात घर कोसळून दोन मुले जखमी  

गेवराईत मान्सून पूर्व पावसाच्या तडाख्यात घर कोसळून दोन मुले जखमी  

गेवराई (बीड ) : आज पहाटे झालेल्या जोरदार पावसाच्या तडाख्याने शहरातील संजयनगर येथील मातीचे घर कोसळून दोन मुले किरकोळ जखमी झाली. मात्र यात घराचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे. 

गेवराई शहरातील संजयनगर भागात मातीचे बांधकाम व पञ्याचे शेड करून काही कष्टकरी लोक राहतात. आज पहाटे शहरात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीने या भागातील भिल्लवस्तीत राहणाऱ्या सुदर्शन बाबुराव बर्डे यांचे मातीचे घर कोसळले. यावेळी घरात असलेले त्यांचे मुले अमोल (१५ ) व कुमार (६ ) हे किरकोळ जखमी झाले. मात्र, यात घराचे मोठे नुकसान झाले असून त्यांना आता दुसरा निवारा राहिला नाही. यामुळे संपूर्ण कुटुंब भर पावसात रस्त्यावर आले आहे. 

Web Title: Two children injured in a collapsing house in Gavrai due to heavy rain