शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याच्या धमकी प्रकरणी नांदेडमधून दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 18:44 IST

दोन्ही संशयितांनी कोणीतरी मुद्दामहून आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोप केला.

बीड/नांदेड : ५० लाख रुपये द्या अन्यथा परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याच्या धमकी प्रकरणी पोलिसांनी नांदेड येथून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.  कथित ड्रग माफियाने विश्वस्तांना धमकीचे पत्र पाठवल्याने शुक्रवारी खळबळ उडाली होती. दरम्यान, आज बीड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने मंदिर परिसराची कसून तपासणी केली.

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील  प्रभू वैद्यनाथ मंदिरास एका व्यक्तीने पत्र पाठवून ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. पन्नास लाख रुपये न दिल्यास  मंदिर उडवून देण्याच्या धमकीचे पत्र  शुक्रवारी वैद्यनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांच्या हातात पडले. लागलीच देशमुख यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यांनतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान बीडच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने मंदिर परिसरात पाहणी केली. तसेच बीड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. श्वानपथकही बोलावण्यात आले होते. 

दरम्यान, पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत पोलिसांच्या एका पथकाने नांदेड येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एकजण बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती आहे. दहशतवाद विरोधी पथकाने दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली. यावेळी दोघांनीही, पुढील दोन दिवसांत आमची कोर्टात महत्वाची तारीख आहे, यातूनच आमच्यासोबत खोडसाळपणा केला गेला असल्याचे सांगितले. कोणीतरी मुद्दामहून आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही संशयितांनी केला. 

काय होते विश्वस्तांना आलेल्या पत्रात  'आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाट देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला ५० लाख रुपयांची गरज आहे. या पत्रातील पत्त्यावर रक्कम पोहोच करावी,अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन', अशी धमकी कथित ड्रग माफियाने पत्राद्वारे दिली होती.

स्वतंत्र पोलीस चौकीची मागणीदेशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, गुजरात ,कर्नाटक ,आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील भाविक येत असतात .या ठिकाणी दररोज दर्शनासाठी  भाविकांची गर्दी होत आहे. वैद्यनाथ मंदिराची खाजगी सुरक्षा व्यवस्था व पोलिसांच्या चार  पोलिस नियुक्त केलेले आहे. परंतु वैद्यनाथ मंदिरासाठी स्वतंत्र पोलीस चौकी असावी अशी मागणी  केली जात आहे तुळजापूरच्या धर्तीवर वैद्यनाथ मंदिरात स्वतंत्र पोलीस चौकी करावी अशी मागणीही होत आहे

टॅग्स :BeedबीडNandedनांदेड