गेवराईजवळ खांडवी फाट्यावर उसाचा ट्रक उलटून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:07 IST2018-03-26T00:07:41+5:302018-03-26T00:07:41+5:30
टाकरवन येथून गढी येथील कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना खांडवी फाटा येथे रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. ज्ञानेश्वर बाबूराव माळी (वय २८, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मयत चालकाचे नाव आहे.

गेवराईजवळ खांडवी फाट्यावर उसाचा ट्रक उलटून चालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : टाकरवन येथून गढी येथील कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना खांडवी फाटा येथे रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली.
ज्ञानेश्वर बाबूराव माळी (वय २८, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मयत चालकाचे नाव आहे.
शनिवारी रात्री माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील ऊस तोडणी केल्यानंतर ट्रक (एम. एच. १७ टी ६३९४) ने गढी येथील साखर कारखान्यावर घेऊन जात असताना माजलगाव - गढी राष्ट्रीय महामार्गावरील खांडवी फाटा येथे ट्रक रस्त्याच्या खाली उलटला.
यामध्ये माळी हे चालक जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने ट्रक रस्त्याखाली गेला. यामुळे पुढील दोन्ही टायर तुटल्याने ट्रक कलंडला. यामुळे ट्रकमधील ऊस कॅबिन तोडून पुढे पडला व या उसामध्ये चालक गुदमरुन त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
या प्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.