शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिनी ५ जून रोजी वृक्षलागवड मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

बीड : जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येणार असून ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे वृक्षलागवडीची अंमलबजावणी ...

बीड : जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येणार असून ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे वृक्षलागवडीची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.

यावर्षी कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू ऑक्सिजनअभावी होणारे रुग्णांचे हाल सर्वांना दिसले आहेत. त्यामुळे नैसर्गिकरीत्या प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या वृक्षांचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले आहे. वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे तीन झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे यासाठी वृक्षलागवड कार्यक्रम संपूर्ण मराठवाडा विभागात राबविण्यात येणार असून, यासंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नुकत्याच विविध सूचना केल्या आहेत.

जिल्हाधिकारी जगताप यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रतिमाणसी तीन तीन वृक्षरोपांची लागवड करण्याबाबत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत पातळीवर प्रत्येक ग्रामपंचायतीने, तर नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील मोकळ्या सार्वजनिक जागेवर प्रतिमाणसी तीन वृक्षारोपण करावयाचे आहे. ग्रामीण भागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या पर्यवेक्षणाखाली सर्व ग्रामपंचायतींना सामाजिक वनीकरण आणि वन विभागाकडून रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.

सर्व नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी किमान एक घन वृक्षलागवड म्हणजे मियावाकी करणे बंधनकारक असून, रस्त्याच्या दुतर्फा, नदीनाल्याच्या बाजूला, सार्वजनिक विहिरीजवळ, शेतकऱ्यांच्या बांधावर, पडीक जमिनीवर वृक्षलागवडीचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार वृक्षलागवड मोहिमेसाठी उपजिल्हाधिकारी रोहयो व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व विभागांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, निसर्गप्रेमी, एनजीओ या सर्वांचाच सक्रिय सहभाग आवश्यक असणार आहे .

दुर्लक्ष केल्यास होणार कारवाई

वृक्षलागवड मोहिमेकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार असून, उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी सर्व नगर परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये किमान शंभर रोपे लावून प्रारंभ करावा

रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड