शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

विनायक मेटेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसंग्रामची धुरा कोणाकडे? ज्योती मेटे म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:55 IST

शिवसंग्राम परिवाराला उघडे पडू देणार नाही, अशी ग्वाही मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिली

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या माजी आमदार विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू होणे हे दुर्दैवच आहे. यामुळे एक लढवय्या नेता समाजाने आणि महाराष्ट्राने गमावला आहे. पेंटर ते आमदार असा संघर्षमय प्रवास असलेल्या मेटेंनी स्थापन केलेली शिवसंग्राम संघटना पोरकी झाली आहे. परंतु आपण जरी शासकीय सेवेत असलो तरी माझ्या परीने जेवढे शक्य होईल तेवढा आधार देईल. शिवसंग्राम परिवाराला उघडे पडू देणार नाही, अशी ग्वाही मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिली आहे. त्यामुळे ही लढाई ज्योती मेटे पूर्ण करतील, अशी अपेक्षाही समाजबांधवांना आहे.

सामान्य कुटुंबातील विनायक मेटे यांना कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. केज तालुक्यातील राजेगावसारख्या छोट्या गावातील मेटे यांचा जीवन प्रवास संघर्षाचा राहिला आहे. परिस्थितीमुळे त्यांनी एक रुपया मजुरीवर पेंटर म्हणून काम केले. परंतु अभ्यास, संयम आणि वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी १९८६ सालापासून मराठा महासंघात स्थान मिळविले. सुरुवातीला कार्यकर्ता आणि नंतर पदाधिकारी असा प्रवास असलेल्या मेटेंच्या गळ्यात १९९६ साली पहिल्यांदा आमदारकीची माळ पडली. तेव्हापासून आतापर्यंत सलग पाच वेळा ते आमदार राहिले.

दरम्यान, मेटे यांनी दि. ६ जानेवारी २००२ साली शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली. अवघ्या काही दिवसांत त्यांनी राज्यभर जाळे तयार करून राजकीय पक्षांचा घटक पक्ष म्हणून दबदबा निर्माण केला. राज्यात दोन आमदारही निवडून आणले. संघटना बहरत असतानाच दि. १४ ऑगस्टची पहाट त्यांच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळी ठरली. मुंबईला जाताना त्यांचे अपघाती निधन झाले आणि सर्व शिवसंग्राम परिवार पोरका झाला. आता कार्यकर्ते आणि कुटुंब या दु:खातून सावरायला वेळ लागणार आहे. परंतु मेटे यांनी सुरू केलेली मराठा आरक्षणाची लढाई पुढे कोण नेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मेटे यांच्या पत्नी ज्याेती मेटे यांनी आपण शिवसंग्रामला आणि कार्यकर्त्यांना उघडं पडू देणार नाहीत. मी शासकीय सेवेत असल्याने माझ्या परीने जेवढे शक्य होईल तेवढी मदत करेल, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना काहीसा धीर मिळाला आहे.

दोन्ही मुले राजकारणापासून दूरविनायक मेटे यांना आशुतोष आणि आकांक्षा अशी दोन मुले आहेत. आशुतोष पुण्यात पदवीचे, तर आकांक्षा या दिल्लीत शिक्षण घेत आहेत. हे दोघेही आतापर्यंत कधीच राजकारणात सक्रिय दिसले नाहीत. सण, उत्सवाच्या वेळीच ते बीडला येत होते, असे सांगण्यात आले. हे दोन्ही मुले राजकारणापासून दूर असल्याने त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्याची शक्यता कमी वाटते, असे दिसते.

बंधू रामहरी मेटेंवर जबाबदारी?विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या शासकीय सेवेत आहेत. त्यामुळे त्यांना संघटनेत सक्रिय राहण्यासाठी अडचणी येऊ शकतात. संघटना की नोकरी? असे दोन पर्याय त्यांच्यासमाेर असणार आहेत. जर ज्योती मेटे यांनी पहिल्याप्रमाणेच नोकरी केली तर ही जबाबदारी विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांच्याकडे दिली जाऊ शकते. ते सध्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून सक्रिय आहेत. सध्या तरी मेटे कुटुंब आणि शिवसंग्राम परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. परंतु मेटे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणाला तरी पुढे येऊन आणखी ताकद निर्माण करावी लागणार आहे, हेदेखील तितकेच खरे आहे.

टॅग्स :BeedबीडVinayak Meteविनायक मेटेPoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षण