तीनवर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:21 IST2021-02-22T04:21:43+5:302021-02-22T04:21:43+5:30

दरडवाडी येथील दिलीप बापूसाहेब दराडे यांचे कुटुंब शेतात वास्तव्यास आहे. शुक्रवारी दुपारी दराडे दाम्पत्य तीन वर्षांचा मुलगा शुभम ...

Three-year-old child drowns - A | तीनवर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू - A

तीनवर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू - A

दरडवाडी येथील दिलीप बापूसाहेब दराडे यांचे कुटुंब शेतात वास्तव्यास आहे. शुक्रवारी दुपारी दराडे दाम्पत्य तीन वर्षांचा मुलगा शुभम याला झोपवून शेतात काम करीत होते. त्यानंतर झोपेतून उठलेला शुभम हा खेळत खेळत बाहेर निघून गेला. दराडे दाम्पत्य घरी आले, तेव्हा शुभम दिसून आला नाही. त्यांनी त्याचा सर्वत्र शोधही घेतला. मात्र, तो मिळाला नाही. शनिवारी सकाळी त्यांचे शेजारी सुरेश रावसाहेब दराडे यांच्या बांधकामावरील पाण्याच्या हौदात शुभम पडला तर नाही? अशी शंका आल्याने गळ टाकून पाहिले असता शुभमचा मृतदेह गळाला लागला. खेळत खेळत जाऊन पाण्याच्या हौदात पडल्याने शुभमचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दिलीप दराडे यांच्या माहितीवरून केज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जमादार मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Three-year-old child drowns - A