शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथांच्या परळीत ‘तिसरा डोळा’ बंद पडू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

परळी : जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून शहरातील प्रमुख चौक, ...

परळी : जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून शहरातील प्रमुख चौक, रस्ते, तसेच सार्वजनिक ठिकाणी ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले हाते; परंतु मागील काही दिवसांपासून सीसीटीव्हीचे २३ कॅमेरे पूर्णपणे बंद असून ही यंत्रणा कोलमडली आहे. परळी वैद्यनाथ शहरातील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेकडे रा. कॉ. जिल्हा उपाध्यक्ष चंदूलाल बियाणी यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

शहरात कॅमेरे प्रमुख चौक, सर्व रस्ते तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. दोन वर्ष कॅमेरे चालू राहिले; परंतु नंतर मात्र या यंत्रणेच्या उपयोगितेकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचे बियाणी यांनी निवेदनात म्हटले आहे. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त असताना, तसेच ही यंत्रणा पोलिसांसाठी मदतीचा हात ठरत असताना या तिसऱ्या डोळ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

शहर व ग्रामीण पोलिसांसाठी गस्त पथक वापराकरिता असलेली वाहने अत्यंत खराब असून परळी शहर व संभाजीनगर ठाण्याला नव्या अत्याधुनिक पेट्रोलिंग वाहनाची उपलब्धता करून द्यावी, असेही बियाणी यांनी या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना देण्यात आल्या आहेत.

गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी असलेली अत्याधुनिक व तेवढीच उपयुक्त यंत्रणा तातडीने पुन्हा कार्यरत करावी व पोलिसांना पेट्रोलिंगसाठी आधुनिक वाहने द्यावीत.

- चंदूलाल बियाणी, राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन विकास समिती सदस्य बीड.

परळी शहरातील २३ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. वायर निघणे, वीजपुरवठा न होणे आदी कारणांमुळे कॅमेरे बंद आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले, तर परळी शहरचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम हे एक महिन्यापासून रजेवर आहेत.