जबरी चोरी करणारे चोरटे अवघ्या काही तासांत अटकेत; आरोपींमध्ये तीन भावंडांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:02 IST2025-01-13T16:01:08+5:302025-01-13T16:02:13+5:30
चोरी प्रकरणात तीन भावांच्या अंभोरा पोलीसांनी आवळल्या मुसक्या!

जबरी चोरी करणारे चोरटे अवघ्या काही तासांत अटकेत; आरोपींमध्ये तीन भावंडांचा समावेश
- नितीन कांबळे
कडा- जबरी चोरी करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरीला गेल्याचा गुन्हा अंभोरा पोलिसात दाखल होताच पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत अवघ्या सहा तासांत पिंपळा परिसरातून आज पहाटे तीन चोरट्यांना अटक केली. तर एकजण पसार झाला. विशेष म्हणजे, आरोपींमध्ये तीन सख्खा भावांचा समावेश आहे. यातील एक अल्पवयीन आहे. अनेक गुन्हे अंगावर घेऊन फिरणाऱ्या आरोपींच्या चोरीनंतर अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्याने अंभोरा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
आष्टी तालुक्यातील हिवरा येथील बापू मच्छिंद्र लगड यांच्या घरी १२ जानेवारीच्या मध्यरात्री जबरी चोरी करून घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली होती. अंभोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध त्याच रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला. गुप्तवार्तावरून पिंपळा परिसरात सापळा लावला. सोमवारी पहाटे पोलिसांना तीन चोरटे हाती लागले तर एकजण पसार झाला. आरोपींमध्ये तीन सख्खा भावांचा समावेश असून एक भाऊ अल्पवयीन आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नवनवीन काॅवत ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे याच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, मनोजकुमार खंडागळे,बाबुराव तांदळे,लुईस पवार, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पैठणे,अमोल शिरसाट, वाहन चालक प्रकाश पडवळ यांनी केली.
काही तासांतच आरोपी जेरबंद
जबरी चोरीचा गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी सहकार्यांना सोबत घेऊन सापळा रचून अवघ्या काही तासांतच गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून अन्य एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.