चंदन चोरांनी टाकला शेतात अड्डा, पोलिसांच्या धाडीत ३२८ किलो चंदनाचा गाभा जप्त, १७ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 15:10 IST2022-01-21T15:09:55+5:302022-01-21T15:10:23+5:30

पोलिसांनी येथून ७ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा ३२८ किलो चंदनाचा गाभा, ४ बाईक असा एकूण ९ लाख ३८ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Thieves sandalwood adda in farm, police seize 328 kg of sandalwood, 17 arrested | चंदन चोरांनी टाकला शेतात अड्डा, पोलिसांच्या धाडीत ३२८ किलो चंदनाचा गाभा जप्त, १७ जण ताब्यात

चंदन चोरांनी टाकला शेतात अड्डा, पोलिसांच्या धाडीत ३२८ किलो चंदनाचा गाभा जप्त, १७ जण ताब्यात

केज ( बीड ) : गेवराई तालुक्यातील चंदन चोरांच्या अड्यावर आज पहाटे पोलिसांनी धाड टाकून सतरा चंदन चोरांना ताब्यात घेतले. यावेळी तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत चंदनाचा गाभा, बाईक आदी तब्बल ९ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील विष्णू साहेबराव बांगर हा आपल्या साथीदारांसह परिसरातील चंदनाची झाडे चोरून स्वतःच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये त्याचा गाभा काढून विक्री करत असल्याची माहिती सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना गुरुवारी मिळाली. यानंतर पोलिस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,  सपोनि संतोष मिसळे, सहायक पोलिस शफी इनामदार, पोहेका बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोना राजू वंजारे  महादेव सातपुते, संजय टूले यांच्या पथकाने आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मोरवड येथील चंदन चोरांच्या अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांनी सतरा चंदन चोरांना जागीच पकडले तर तिघेजण पळून गेले.

पोलिसांनी येथून ७ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा ३२८ किलो चंदनाचा गाभा, ४ बाईक असा एकूण ९ लाख ३८ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक संतोष मिसळे यांच्या फिर्यादीवरून चकलंबा पोलिस ठाण्यात २० चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Thieves sandalwood adda in farm, police seize 328 kg of sandalwood, 17 arrested