शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

अंबाजोगाईतील माळीनगरातील दोन घरात जबरी चोरी; गळ्याला चाकू लावून लुटला पावणेतीन लाखांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 18:54 IST

शहरातील मध्यवर्ती आणि दाट वस्तीच्या भागातील माळी चौक भागात आज पहाटे चार चोरट्यांनी धुमाकूळ घालत कुमार गायकवाड आणि त्यांचे भाडेकरू उमाकांत देशमुख यांच्या घरी जबरी चोरी करत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी मानेला चाकू लावल्याने एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

ठळक मुद्देकुमार बाळनाथ गायकवाड यांचे अंबाजोगाई शहरातील सावता माळी चौकात स्वतःचे घर आहे. त्यांच्या घरात पहाटे दोन वाजताच्या सुमारास तोंडाला काळे फडके बांधलेल्या चार चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी काढून आत प्रवेश केला

अंबाजोगाई ( बीड ) : शहरातील मध्यवर्ती आणि दाट वस्तीच्या भागातील माळी चौक भागात आज पहाटे चार चोरट्यांनी धुमाकूळ घालत कुमार गायकवाड आणि त्यांचे भाडेकरू उमाकांत देशमुख यांच्या घरी जबरी चोरी करत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी मानेला चाकू लावल्याने एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी कुमार बाळनाथ गायकवाड यांचे अंबाजोगाई शहरातील सावता माळी चौकात स्वतःचे घर आहे. त्यांच्याच इमारतीत ममदापूर पाटोदा येथील उमाशंकर भैरूसाहेब देशमुख हे कुटुंबासहीत भाड्याने राहतात. शुक्रवारी रात्री दोन्ही कुटुंबातील सदस्य नित्यनेमाने जेवण करून झोपी गेले. आज दि. ३ फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास तोंडाला काळे फडके बांधलेल्या चार चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी काढून आत प्रवेश केला आणि गायकवाड कुटुंबियांना उठविले. कुमार गायकवाड यांच्या पत्नी कुसुम यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत कुमार यांची सोन्याची अंगठी, कुसुम यांच्या कानातील सोन्याचे दोन झुंबरजोड, सरपाळे, मनीमंगळसूत्र, मिनीगंठन बळजबरीने काढून घेतले. ‘पैसे कहां है बताओ नाही तो मार दुंगा’ असा दम देऊन कुसुम यांच्याकडून कपाटाची किल्ली घेतली आणि हँडबॅगमधील रोख ८ हजार रुपये, पँटच्या खिशातील रोख १० हजार रुपये आणि सोन्याचे पट्टी गंठन काढून घेतले. नंतर त्यांच्या मुलाच्या खोलीत जावून त्याचा मोबाईल फोडला आणि तिथे झोपलेल्या मुलीच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र, कानातील झुमके, कपाटातील रोख ४ हजार रुपये काढून घेतले.यावेळी झालेल्या झटापटीत कुमार यांच्या मुलीच्या गळ्याला आणि हाताला चाकू लागून त्या किरकोळ जखमी झाल्या. 

त्यांनतर चोरट्यांनी कुसुम यांच्या गळ्याला चाकू लावून भाडेकरू उमाकांत देशमुख यांच्या खोलीकडे नेले आणि आवाज देऊन त्यांना उठविण्यास सांगितले. देशमुख यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच तीन चोरट्यांनी देशमुख आणि त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या गळ्याला चाकू लावत पाच ग्रामचे मनीमंगळसूत्र, रोख २ हजार रुपये आणि मुलीचा मोबाईल काढून घेतला. यानंतर चोरट्यांनी पोलिसात गेलात तर उद्या येऊन खल्लास करूत अशी धमकी दिली आणि ते निघून गेले. जवळपास ४५ मिनिटे चोरट्यांचा हा धुमाकूळ सुरु होता. दोन्ही घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ७४ हजाराचा ऐवज लांबविला. याप्रकरणी कुमार गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांवर कलम ३९४, ३४ अन्वये अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक तड्से हे करत आहेत. 

दरम्यान, चोरीची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे आणि सहा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बीड येथून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते, परंतु विशेष काही हाती लागले नाही. चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या देत चोरी करण्याची मागील काही वर्षातील ही पहिलीच घटना असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.